मुरबाड कल्याण रोडवर खडी वाहतूक डंपरखाली चिरडून एका युवकाचा मृत्यू ;संतप्त नागरिकांनी रास्ता रोखला,प्रेत ताब्यात घेण्यास नकार...!
नामदेव शेलार/ मुरबाड : म्हारळ कांबा मुरबाड माळशेज घाट रस्त्यावरून दगड खाणी क्रेशर प्लांट मधून ओवरलोड डंपर भरून खडी क्रेशरची रेती मातीची वाहतूकभरधवावेगाने करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करूनही कारवाई झाली नसल्याने पुन्हा एकदा एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. म्हारळ कांबा मुरबाड रस्त्यावर एका मोटरसायकल स्वराच्या अंगावरून केशर खडीचा ट्रक गेल्याने 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वाहनांना जागा देऊन पुढे जाताना युवकाची मोटरसायकल रस्त्यावर पडली त्यावेळी भरधवावेगाने मुरबाड कडून येणाऱ्या डंपरचे चाक युवकाच्या अंगावरून जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी तात्काळ रास्ता रोको आंदोलन करून महसूल विभागाने मुरबाड कल्याण माळशेज घाट रस्त्यावर ओव्हरलोड खडी माती रेती क्रेशर भरून घेऊन जाणाऱ्या डंपर ट्रक वर गुन्हे दाखल करण्यास यावेत अन्यथा मृत्यू युवकाचा प्रेत ताब्यात घेणार नाही त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी रास्ता रोको करणाऱ्यांची समजूत घालून मुरबाड कल्याण रस्ता खुला केला.
मुरबाड कल्याण रस्त्यावर रात्रंदिवस ओव्हरलोड खडी माती डांबर रेती क्रेशर खडी भरून डंपर ट्रक भरगाव वेगाने वाहतूक करतात महसूल विभाग आरटीओ पोलिसांना हप्ते देऊन खुलेआम वाहतूक करतात वरप कांबा मुरबाड बदलापूर परिसरात मोठ्या प्रमाणात दगड माती खदानी आणि सिमेंट प्लांट क्रेशर मशिनरी रात्रंदिवस सुरू आहेत तेथून मोठ्या मोठ्या डंपरने वाहतूक भरधाव वेगाने सुरू असून अनेक अपघात झाले आहेत त्यावर चालणारे पादचारी लहान वाहने यांना धोका निर्माण झाला आहे.
डंपर मधून ओव्हरलोड खडी रेती माती उघड्यावर वाहतूक केली जाते त्याचे कण नागरिकांच्या डोळ्यात जाऊन इजा होत आहे अनेक वाहने माळशेज घाट रस्त्यावरून रेतीची वाहतूक कल्याण बदलापूर उल्हासनगर टिटवाळा कडे करत आहेत.



No comments