रक्षाबंधनासाठी महिलांची बाजारपेठेत तुडुंब गर्दी प्रवासी वाहनांचा तुटवडा..!
नामदेव शेलार / मुरबाड : रक्षाबंधनाच्या अतूट नात्यांचे महत्त्व जोपासण्यासाठी बाजारपेठेत राख्यांची दुकाने सजली आहेत एक दिवस अगोदर पासून राख्या खरेदीसाठी महिलांची तुंडूब गर्दी झाली आहे भाऊ बहिणीचे अतूट नातं जोपासण्याचा सण नारळी पौर्णिमेला येणारा रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून त्याच्या सुरक्षा ची काळजी घेणारी बहीण बाजारात असेल त्या किमतीमध्ये राखी खरेदी करत आहे.
गेल्या काही वर्षात जमिनी मालमत्ता घरे यांच्यात भाऊ हिस्स्यासाठी भावा बहिणीमध्ये दरी निर्माण झाली होती मात्र त्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली असल्याच्या भावना अनेक बहिणींनी बोलून दाखवली काही बहिणींचे म्हणणे आहे की पुढच्या काळात कोणाला भाऊ आहे कोणाला बहिणीच असतील आम्हाला आज भाऊ आहेत हे आमचं भाग्य आहे आम्हाला काहीही हिस्सा नको भाऊ बहिणीचे अतूट नाते जोपासावं हेच बहिणीचा हिस्सा मानतो आमच्या दहा रुपयाच्या राखीच्या धाग्यात राष्ट्रीय एकात्मतेची ताकद आहे आज प्रत्येक स्त्री लाडकी बहीण बनली आहे त्यापेक्षा आम्हाला काय हवं अशा शब्दात भावासाठी ओवाळणी केली आहे.
रक्षाबंधनासाठी खाजगी वाहने प्रवासी वाहने भरगच्च भरून प्रवासी वाहतूक करत असून एसटी महामंडळाच्या बसेस कमी पडले आहेत त्यासाठी एसटी बसेस सेवा वाढवावी अशी मागणी होत आहे बाजारपेठेत मिठाई गजरे राख्यांची विक्रीने उच्चांक गाठला आहे रक्षाबंधन दिवस प्रत्येक बहिणीला भावाकडे जाण्याची ओढ लागली आहे आपल्या परिस्थितीवर मात करून राखीचे बंधन संगोपन केले जात आहे.




No comments