मुरबाड मधील इएसआयसी (ESIC) भ्रष्टाचाराची चौकशी एटीएस मार्फत व्हावी नागरिकांची मागणी..!
नामदेव शेलार / मुरबाड : कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजे इएसआयसी ही संस्था गोरगरीब कर्मचाऱ्यांच्या आरोग्य समस्या मदतीवरील लोणी खाणारी बनली आहे या गैरव्यवहारात बडे-बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे आरोग्य विभागाचा टेंडर घोटाळे ,ॲम्बुलन्स घोटाळा असे आरोग्यातील अनेक घोटाळे बाहेर आले मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही कोरोना पासून धर्मदाय आयुक्तांच्या अतिरिक्त खाली असणारी हॉस्पिटल हे चर्चेत आली आहेत.
ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालय आपला दवाखाना येथील गोरगरीब मध्यमवर्गीय यांना मिळणारे औषधे उपचाराबरोबर होणारा आरोग्य खर्च याची चौकशी शासन स्तरावर अद्याप झालेली नाही केवल कारवाईचा फास संबोधून क्लीन चीट दिली जाते यावर सामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काही दिवसापूर्वी ॲम्बुलन्स घोटाळा राजकीय नेत्यांनी उघडकीस आणला होता परंतु मुरबाड तुळई रस्त्यावर एका फार्म हाऊस वर 40 ॲम्बुलन्स बेवारस कोणाच्या त्याचा तपास अद्याप लागलेला नाही असे बोलले जाते.
महाराष्ट्रात इएसआयसी हॉस्पिटलमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांसह त्यांच्या कुटुंबांना मोफत उपचार मिळतात त्यासाठी संबंधित कामगारांच्या नोंदी कामगार आयुक्तांसह औद्योगिक वसाहत अधिकाऱ्यांकडे असतात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टर औषधोपचार करण्यासाठी शासनाने निवडलेले हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर औषधोपचार केले जात नाहीत हॉस्पिटलचा नकाशा फायर ऑडिट नियमात बसणाऱ्या परवानग्या अकृषीक इमारती तज्ञ डॉक्टर त्यांची ठिकाणे याकडे दुर्लक्ष केले जात असून कर्मचाऱ्यांची लूट,ई एस आय सी चालवणारे हॉस्पिटल करत आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी शासनाकडे मुरबाड करांनी तक्रारी केल्या होत्या त्याची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू होऊन वरिष्ठांनी एक समिती नेमली आहे.
मुरबाड शहरात असे किती हॉस्पिटल आहेत त्यांना कोणत्या अटी शर्तीवर, ई एस आय सी हॉस्पिटलचा लाभ दिला त्याचा ऑडिट कसा होतो त्यामध्ये काय त्रुटी निर्माण झाल्या तेथील वैद्यकीय डॉक्टर असे हॉस्पिटल चालू शकतो काय? ज्यांच्या नावे हॉस्पिटल चालवला जातो त्या डॉक्टरांचं वास्तव्य कुठल्या शहरांमध्ये आहे.हॉस्पिटल खरेचे की खोट्याचे त्यांनी रुग्णांची सुरक्षा अबाधित ठेवली आहे काय? मुरबाड एमआयडीसी मधील नोंदणीकृत कामगार सुरू असलेल्या कंपन्या बंद कंपन्या बोगस कंपन्या ज्यांची नोंद शासन आणि औद्योगिक मुख्यालयाकडे नाही अशा बोगस कंपन्यांचे कामगार खरेचं उपचार घेतात काय? त्याची चौकशी शासनाची समिती करणार आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई परेल इएसआयसी विभागाने चौकशीसाठी एक समिती नेमली आहे इएसआयसी खरेचं किंवा बोगस आहेत हॉस्पिटल कुठे आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशा हॉस्पिटलचा ऑडिट करणाऱ्यांची चौकशी एटीएस मार्फत करण्यात यावी अशी मागणी होत आहे.



No comments