राष्ट्रपती पदकधारक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी Prashad Pandhre यांना अप्पर उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभागपदी बढती
नामदेव शेलार / मुरबाड,ठाणे : गोरगरिबांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय देणारे अवैद्य धंद्यांवर कठोर कारवाई करून सामाजिक सलोखा राखणारे व्यसनाधीस तरुणांना उद्योग व्यवसाय प्रवाहामध्ये आणण्यासाठी मार्गदर्शन करून त्यांच्या सुधारणा घडवणारे कर्तव्यदक्ष राष्ट्रपती पदक धारक पोलीस अधिकारी प्रसाद पांढरे (Prashad Pandhre) यांना अप्पर उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई पदी बढती मिळाली आहे.
राज्याच्या पोलिस खात्यात अत्यंत संवेधीनशील लोकमित्र जाणकार उत्तम प्रशासकीय अधिकारी असलेल्या प्रसाद पांढरे यांनी मुरबाड मधील गुन्हेगारीत कायमचा बदल घडवून आणला चोऱ्यामाऱ्या दरोडे आणि गंभीर गुन्हेगारांना वचक बसवून ग्रामीण शहरी नागरिकांमध्ये कौटुंबिक वारसा निर्माण केला त्यांना राज्य गुप्तवार्ता मुंबई विभागात अप्पर उपायुक्त पदी भरती मिळाल्याने त्यांचे आमदार किसन कथोरे विकास मंच अध्यक्ष ज्योतीताई नामदेव शेलार यांनी अभिनंदन केले आहे तसेच मुरबाडच्या नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रशासनात जागृत गंभीर समस्या वर तात्काळ तोडगा काढणारे सामाजिक सलोख्याचे प्रेरणेते,अशी प्रसाद पांढरे यांची ख्याती आहे मुरबाड मधून बदली होऊन जाताना ढसाढसा रडणारे हजारो चाहते त्यांच्या बढती मिळाल्याने आनंद व्यक्त करून पेढे वाटप करत आहेत. आमच्या भावाला प्रसाद पांढरे यांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बढती मिळाल्याने आमच्या राखीचं बंधन आमच्या रक्षणासाठी अधिक मजबूत झाल्याच्या भावना आमदार किसनराव कथोरे विकास मंचच्या अध्यक्ष ज्योतीताई शेलार यांनी व्यक्त केल्या आहेत.



No comments