मुरबाड मध्ये पारंपारिक दहीहंडी सोहळा शहरात रंगली दहीहंडी स्पर्धा..!
नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाडच्या ग्रामीण भागात आदल्या दिवसापासून गोकुळाष्टमीचा पारंपारिक उत्सव प्रत्येक गावागावात साजरा झाला रात्रीच्या भजन हरिपाठ जागरणाने मध्यरात्री श्रीकृष्णाचा पाळणा उत्सव करण्यात आला सकाळी गावांमधील छोट्या छोट्या हंड्या बाल गोपाळांनी फोडल्या प्रत्येक गावात दहीकाला उत्सवाचे सामन नदीमध्ये विसर्जन करण्यात येते मुरबाड तालुक्यात मुरबाड सरळगाव धसई टोकावडा म्हसा येथे शहरीकरण झाल्याने अनेक ठिकाणी दहीहंडी बांधण्यात येतात मात्र मुरबाड शहरात गेल्या दहा वर्षापासून दहीहंडीची स्पर्धा अधिक रंगत चालली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी नेते पुढारी प्रमुख पाहुण्यांची रेलचेल संध्याकाळ सात वाजेपर्यंत सुरू राहत त असल्यामुळे बाजारपेठ गर्दीने गजबजली होती पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याने दहीहंडीचा स्पर्धा अधिक रंगीत बनली युवकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येकाच्या आयोजनाची रुपरेषा बक्षीसे आकर्षित होती. मुरबाडची दहीहंडी मंडळे दरवर्षीप्रमाणे बदलापूर अंबरनाथ कल्याण शहरात जाऊन गोपालकाला दहीहंडीचा आनंद साजरा केला मात्र अनेक नागरिक आपल्या घरात टीव्हीसमोर बसून मुंबई ठाणे पुण्यामधील दहीहंडी उत्साहाचा आनंद लुटत होते.मुरबाड च्या राममंदिर मध्ये सुद्धा गोपाळ काळा साजरा केला होता


No comments