मुरबाड-शहापुर प्रवास ठरतोय जिवघेणा नव्या पुलाला भगदाड; भ्रष्टाचार दडपण्यासाठी ठेकेदार शिंदे गटात?..!
गौरव शेलार / मुरबाड : ठाणे जिल्हयातील मुरबाड -शहापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (अ) हा दोन तालुक्याना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावर काळू नदिवरील दोन वर्षा पुरवी बांधलेल्या पुलाला मोठे भेगा पडल्ययाने होणारी दुर्घटना टाळण्यासाठी तात्काल वाहतुक बंद करण्याची मागणी नागरिका कडून होत आहे.मुरबाड शहापुर या लगतच्या तालुक्याना जोडणा-या रस्त्याचे काम व शहापुर कर्जत पर्यंत प्रस्तावित रस्त्यावरील काळू नदिवर हा पुल बांधण्यात आला होता.
एमएसआरडी ह्या विभागाकडून रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षा पासून कासव गतीने सुरू आहे, जागोजागी रस्ताखोदून ठेवल्याने अपघाताच्या मालिकेत अनेकांचे बळी गेले व जात आहेत, तर काहीना झालेल्या अपघातात का़यमस्वरूपी अपंगत्व आले आहे, ह्या रस्त्यावरील काळू नदीपात्रात दोन वर्षापुर्वी बांधलेल्या पुलाला भेगा पडल्या असल्याने हा पुल जणू मृत्याचा सापळा बनला आहे.हा पुल दोनच वर्षात ढासळू लागल्याचे पाहता या कामावर नेमलेले जबाबदार अधिकारी ,इंजिनियर जरी उच्चशिक्षीत असले तरी त्यांच्या कामात "उंची"नसल्याने दोनवर्षात लावलेला कलर निघायच़्या आत नदीपात्रातील पुलाला भेगा पडून जिवघेणा बनला आहे. या रस्त्याला पडलेल्या भेगा व त्या वरून अवजड वाहने जात येत असल्याने मृत्यूचा सापळा बनला असल्याने दुर्घटना घडून जिवित हाणी होऊ नये म्हणून वाहतुक बंद करण्याची मागणी होत आहे.
विशेष म्हणजे ज्या विभागाकडून हा पुल बांधला गेला तो एमएसआरडीसी हा विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असून ह्या रस्त्याचे काम करणारी कंट्रक्शनचे ठेकेदार हे सध्या या शिंदे गटाचे उपनेते आहेत. मात्र या भ्रष्टाचाराला आळा घालून पारदर्शक मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करणार का? की मित्र पक्ष सलोखा वाढवण्यासाठी पाठिशी घालणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.



No comments