web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड शहरांमधील रस्ते गटारी अपूर्णच शासनाचा निधी ठेकेदारांनी पळवला..!

 

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील जोगेश्वरी आळी,मातानगर, डाकबंगला मुख्य बाजारपेठ, सोनारपाडा, गणेशनगर ,तीन हात नाका, जैन मंदिर, माळीपाडा ,उगळेआळी सह शहरातील सर्व रस्ते गटारीवर कोटीचा निधी खर्च दाखवून केलेल्या निकृष्ट रस्ते गटारी नागरिकांना हानिकारक ठरत आहेत. कोट्यावधीची कामांची टेंडर काढून कामे न करताच सुभे ठेकेदारांनी लाख रुपयाची बिले काढले असून शासनाच्या चौकशीने कारवाई होईल या भीतीने एका ठेकेदारांनी मुरबाड नगरपंचायतीच्या खात्यात आठ लाख रुपये जमा केले त्याचा हिशोब नगरपंचायतीला लागत नसल्याने पैसे कोणाचे कुठून आले अशी बेवारस नोंद झाली आहे.

जोगेश्वरी आणि प्रभाग सात मध्ये अंडरग्राउंड गटारी तयार केलेल्या नसताना तसेच काँक्रेट रस्ता अपूर्ण असताना ठेकेदारांनी बिल काढला आहे त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल पासून माता नगर पर्यंत बनवण्यात आलेला काँक्रीट रस्ता पेवर ब्लॉक निकृष्ट बनवून सांडपाणी रस्त्यावर सोडले आहे मुरबाड बाजारपेठेतील रस्त्यावर खड्डे पडले असून शहरातील गटारी प्रमुख नाल्याला जोडलेल्या नाहीत त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.

रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर वाहने जाताना पाणी उडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत शहरातील खुलेनाट्यगृहाच्या जागेत काँक्रिटीकरण करून भिंतीचे बांधकाम केले मात्र पाणी जाण्यासाठी गटार बनवण्यात आलेली नाही शहरांमध्ये संचालयाच्या सोयी नाहीत अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत माता नगर गणेश नगर रस्त्यावरून राष्ट्रीय महामार्गाला जाणाऱ्या रस्त्यावरून दोन वाहने एकाच वेळी जात नाही मात्र शासनाने कोटी रुपयाचा निधी ठेकेदारांना दिला त्या सर्व ठेकेदारांच्या कामाची चौकशी शासनाने उच्चस्तरीय समिती नेमून करण्यात यावी अशी मागणी मुरबाड शहरवासीयांनी केली आहे.

मुरबाड शहरासाठी माजी खासदार कपिल पाटील यांनी दहा कोटी रुपये दिल्याचे सांगितले तसेच खासदार बाल्या मामा म्हात्रे आमदार किसन कथोरे यांनी सुद्धा कोटी रुपये निधी रस्ते गटारी पेवर ब्लॉक पाणीपुरवठा यासाठी दिले आहेत शासनाच्या दप्तरी मुरबाड शहरातील रस्ते गटारीसाठी सर्वात जास्त निधीचे टेंडर होऊन निधी खर्च झाला गेल्या दहा वर्षात 17 प्रभागासाठी शंभर कोटीच्या आसपास निधी खर्च कोणत्या कामावर झाला त्याची चौकशी करून संबंधित सर्व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी शहरवासीयांनी मागणी केली आहे.

No comments