web-banner-lshep2024

Breaking News

माळशेज घाटाकडे पर्यटकांची पाऊले धबधबे सुरू घाटात मात्र धोका कायम;मटन-भाकरीला मोठी मागणी..!

नामदेव शेलार / मुरबाड : पावसाळा सुरू झाला आणि माळशेज घाट पर्यटकांनी फुलून गेला आहे मुंबई उपनगरासह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांची गर्दी माळशेज घाटातील Malshej Ghat धबधब्यांकडे झाली आहे. दरवर्षी माळशेज घाटात धबधब्यांची मज्जा लुटण्यासाठी हजारो पर्यटक कुटुंबासह वाहनाने येतात यावर्षी पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे संपूर्ण घाट परिसरात 60 किलोमीटर परिसर धुक्याने व्यापून टाकला आहे जागोजागी रस्त्याच्या कडेला धबधबे वाहत असल्याने लहान मोठ्या पर्यटकांना माळशेज घाट ओले चिंब भिजवून आनंद देत आहे.

निसर्गरम्य माळशेज घाटात माकड माणसांशी संवाद साधतात माकडांना अनेक पर्यटक खाण्यासाठी विविध पदार्थ घेऊन येतात शेकडो फूट खोलदरीचा माळशेज घाट मात्र दरडी कोसळत असल्याने दरवर्षी धोक्याचा असतो माळशेज घाटातील अरुंद रस्ता वाहनांची तुफान गर्दी पार्किंगसाठी जागा नाही कल्याण मुरबाड नगर पुणे महामार्गावरील या माळशेज घाटातून शेकडो एसटी बसेस खाजगी वाहने जातात त्यांना सुद्धा पर्यटकांच्या वाहनांचा खोळंबा होतो याकडे आजपर्यंत संबंधित यंत्रणेने लक्ष वेधलेले नाही.

माळशेज घाटात डोंगरावरून रस्त्याच्या मध्यभागी वाहणारा धबधबा आणि माळशेज घाटाच्या कोपऱ्यात वाहणारा काळू धबधबा माळशेज घाटाचे आकर्षण आहे. माळशेज घाटातील रस्त्यावरील खड्डे तसेच तेथे झालेले अपघात पर्यटकांच्या नजरेसमोर असताना पावसाळ्यामधील माळशेज घाट पर्यटकांनी फुलला आहे. माळशेज घाट सावर्णे थिदवी पासून निसर्गरम्य वातावरणात सुरू होतो 150 -200छोटे-मोठे धबधबे एमटीडीसी पर्यटन स्थळापर्यंत आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांच्या जेवणावेळी पार्ट्या याच घाटात दरवर्षी कार्यकर्त्यांना आकर्षित करत आहेत.

माळशेज घाटात जाणारे पर्यटकांची मुरबाड मधील भारत वाईन शॉप मध्ये तुटुंब गर्दी दारू खरेदीसाठी होते तेथील हॉटेल कोळीवाडा मधून मटन भाकरी घेण्यासाठी पर्यटकांची बुकिंग आत्तापासूनच सुरू झाल्याची माहिती हॉटेल मालक गौरव शेलार यांनी दिली आहे. माळशेज घाटात जाणाऱ्या पर्यटकांना भाकरी चपाती तसेच कोंबडा मटन बिर्याणी मच्छी अन्य पदार्थ बनवून दिले जातात चविष्ट चवदार झणझणीत मटन मच्छी पर्यटकांना माळशेज घाटात कौटुंबिक सहलीचा आनंद देत आहे.

माळशेज घाटातील रस्त्यावर रानभाज्या पालेभाज्या फळे विक्री करणाऱ्या महिला पुरुष उभे असतात त्यांच्याकडून पर्यटक वस्तू खरेदी करतात हे त्यांच्या कौटुंबिक उदारनिर्वाचे पावसाळी साधन मानले जाते. मुरबाड पासून घाटमाथ्या पर्यंत पर्यटकांची सकाळी जाण्यासाठी गर्दी असते मात्र संध्याकाळी परतीच्या प्रवासाला पर्यटकांच्या वाहनाने मुरबाड तीन हात नाक्यावर ट्राफिक जाम होते. माळशेज घाटात पर्यटकांचे संरक्षण करण्यापलीकडे प्रत्येक प्रवासाच्या वाहनांना रस्त्यामध्येच अडवून राष्ट्रीय महामार्ग पोलीस नाहक त्रास देऊन नियमावली दाखवून चांगली वसुली करतात त्यामधून राज्य परिवहन विभागाला चांगलाच फायदा होत असावा पण पर्यटकांची नाराजी स्थानिक लोकप्रतिनिधींना सहन करावी लागते.

  माळशेज घाट मुरबाडचे सौंदर्य असून घाटात रस्ते महामार्ग पोलिसांकडून होणारा त्रास थांबला पाहिजे हे नाही ते नाही याच्या नावाखाली पैशाची वसुली पर्यटकांना सतावत आहे. असे पर्यटकांचं म्हणणं आहे माळशेज घाटाच्या शेजारी नाणेघाट सिद्धगड हरिश्चंद्रगड याकडे पर्यटकांची पावले वळतात जेथे पोलिसांचा त्रास होतो तिकडे पर्यटक न जाता नाणेघाट हरिश्चंद्रगड काळू धबधबा सिद्धगड अशी ठिकाने पर्यटक निवडतात.

No comments