सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजरी यांची जुगार अड्ड्यांवर कारवाई
गौरव शेलार \ उल्हासनगर : उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात उघडपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर स्थानिक पोलिसांनी कडक कारवाई केली आहे आणि आरोपींना अटक केली आहे.या ठिकाणांहून पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्यही जप्त केले आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय काजरी करत आहेत. उल्हासनगर-१ परिसरातील सोनार गल्ली येथे एका आईस्क्रीम दुकानाच्या मागे रिकाम्या जागेत जुगार मटका अड्डा चालवला जात होता. स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि जुगार अड्डा पकडला.
घटनास्थळावरून दोन जणांना यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून मटका जुगाराचे साहित्य आणि १,९१० रुपये रोख जप्त करण्यात आले. पोलिस कॉन्स्टेबल गणेश गावडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
No comments