web-banner-lshep2024

Breaking News

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या सभासद नोंदणी अभियानात सहभागी होण्याचे राष्ट्रीय अध्यक्षांचे अहवान विविध क्षेत्रातील कमिट्या होणार जाहीर...!

ठाणे / विशेष प्रतिनिधी : गेली काही वर्ष देशभरात पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या शासन मान्यता एनजीओ संस्था स्वतंत्र संपादक पत्रकार संघ (रजि) Swatantra Sampadak Patrakar Sangh यांनी नवीन सभासद पदाधिकारी यांच्या नोंदणी अभियानाला सुरुवात केली आहे दरवर्षी सदस्य नोंदणी अभियान सुरू करून विविध स्तरावरील जनसामान्यांना मदतीचा हात दिला जातो विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षीपासून नवीन उपक्रम राबवण्याचा निर्णय संस्थांच्या संचालक मंडळांनी घेतला असून विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत.

शिक्षण आरोग्य नोकरी शेती व्यवसाय रोजगार बरोबर जेष्ठ नागरिक निवृत्त प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मोफत मार्गदर्शन मदत केंद्र उभारले जाणार आहेत तसेच सामाजिक विकसित प्रशासकीय सेवा शिक्षणासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

स्वतंत्र संपादक पत्रकार संस्थांच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे पत्रकारांना सर्व स्तरातून मदत व्हावी यासाठी संस्था सामाजिक कार्यातून पत्रकारांनी कामे करावी म्हणून त्यांनी स्वतंत्र संपादक पत्रकार संस्थेमध्ये सामील व्हावे असे आवाहन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी शेलार यांनी केले आहे.

सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या विविध संघटना संस्था यांच्याशी सल्लंघन राहून सामाजिक चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे स्वतंत्र संपादक पत्रकार संघ-संस्था, आदिवासी संघटना ,मुरबाड विधानसभा क्षेत्र विकास मंच संस्था एकत्र काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.असून प्रत्येक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती या जून महिने अखेर पूर्ण करून जनतेच्या समस्या कार्यकर्त्यांनी सोडवण्यासाठी प्रत्येक गाव वाड्या-पाडे शहरात सभासद नोंदणी सुरू केली आहे.

    राजकीय विरहित सामाजिक संस्थेचे काम करताना प्रत्येक समन्वयक संघटना पदाधिकाऱ्यांचे एकमताने भावी प्रत्येक निवडणुकीत चांगल्या व्यक्तीला मदत करण्याचा निर्णय एकमताने घेतला जाणार आहे तरी नवीन सभासद होण्यासाठी मुख्यालय मुरबाड जिल्हा परिषद रेस्ट हाऊस गेट समोरील स्वतंत्र संपादक पत्रकार भवन कार्यालयात भेट द्यावी असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी शेलार मोबाईल नंबर 7057011010 यांनी केले आहे.


No comments