मुरबाडच्या भारत वाईन शॉपची उत्पादन शुल्क पोलिसांकडून तपासणी;हातावर आकडे लिहून वाईन शॉप मालकाशी केला हिशोब..!
नामदेव शेलार / मुरबाड : न्यू इंग्लिश स्कूल शाळेसमोरील नगरपंचायतीच्या बिल्डिंग मधील हुतात्मा वीर हिराजी पाटील स्मारका लगत असलेल्या भारत वाईन शॉप वर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी आपल्या पोलिसा समावेत धाड टाकून दारूच्या बाटल्या मोजल्या. सदर भारत वाईन शॉप मधील कोणती दारू त्याचे बॉक्स बाटल्या यांची आकडेवारी उत्पादन शुल्क पोलिसांनी वाईन शॉप चालकाच्या हातावर हिशोब करून शासकीय इमानदारी जोपासली आहे.
मुरबाड माता नगर साईबाबा मंदिर सार्वजनिक रोडवर भारत वाईन शॉप आहे तेथून ट्वेंटी - ट्वेंटी दारूच्या बाटल्या पासून विविध प्रकाराचे दारूचे खंबे विक्री होतात माळशेज घाटात जाणाऱ्या पर्यटकांपासून धावे टपऱ्यांवर पिण्यासाठी भारत वाईन शॉप मधून लाखो रुपयाची दारू विक्री रोज होते त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर दारू खरेदी दारांची गर्दी असते दारू विक्रीच्या व्यवसायामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिला नागरिक शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिकांना खूप त्रास होतो परंतु भारत वाईन शॉप मालक राजकीय भागीदारांचा नाव पुढे करून कोणी तक्रार केल्यास त्याची गुंडांना सुपारी देऊन आपला दारू व्यवसाय जोमाने चालवत आहे.
भारत वाईन शॉप दारू साठवणुकीचे दोन गाले असून तेथील दारूचा साठा तसेच नकली दारू असली दारूची पहाणी दर पंधरा दिवसांनी उत्पादन शुल्क अधिकारी करत असल्याचे दुकान मालक मनुभाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देण्यास नकार देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यात सांगितले भारत वाईन शॉप मधून बनावट दारू विक्री होते रस्त्यावर दारू घेणाऱ्यांची गर्दी होते सार्वजनिक शासकीय इमारतींमध्ये दारू विक्रीचा लायसन्स नसताना भर बाजारपेठेत भारत वाईन शॉप ला परवानगी कोणी दिली याकडे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी शासनाने दुर्लक्ष केल्याने भारत वाईन शॉप ची कागदावर होणारी तपासणी नोंद वाईन शॉप धारक आणि तपासणी उत्पादन शुल्क अधिकारी हातावर पेनाने आकडे लिहून करत असल्याचे उघड झाले आहे.
एका लायसन्स वर दोन वाईन शॉप मुरबाड मध्ये चालतात त्याची माहिती उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे नसल्याचे सांगून वाईन शॉप मालक मनुभाई यांनी उत्पादन शुल्क अधिकारी दर पंधरा दिवसांनी माझ्या वाईन शॉप मध्ये येतात तपासणी करतात अशी माहिती दिली.एवढे दिवस भारत वाईन शॉप उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या तपासणीवर चालत असताना 24 जूनला चार तास उत्पादन शुल्क अधिकारी कोणत्या आकड्याचा हिशोब करत होते त्यांना काय सापडलं याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशी मुरबाडकरांची मागणी आहे.
भारत वाईन शॉप च्या दारू विक्रीने रस्त्यावर भांडण तंटे होतात गुन्हेगारी वाढत चालली आहे संपूर्ण मुरबाड तालुक्यात लग्न समारंभ वाढदिवस विविध कार्यक्रम निवडणुका सणावारांना भारत वाईन शॉप मधून दारू खरेदीसाठी तुफान गर्दी होते जुलै महिन्याच्या शेवटी गटारी अमावस्याला भारत वाईन शॉप मध्ये दारू खरेदीसाठी जत्रा भरते परंतु शासन संबंधित मंत्री भारत वाईन शॉप वर काहीही कारवाई करत नाही त्यांचे अनेक लोकांशी असणारे संबंध दारूच्या पैशाने गुंडगिरीचा दबाव तंत्र मुरबाडकरा मध्ये भीतीचे सावट पसरले आहे. उत्पादन शुल्क पोलिसांची वाहन काही तास उभी राहिल्याने मुरबाडकर काय कारवाई होते याची वाट पाहत होते दुकानासमोर मात्र उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी भारत वाईन शॉप च्या मालक मनुभाई यांना उल्हासनगर येथून बोलावून घेऊन एक तासानंतर दोघांच्या बोटावर आकडे लिहून तपासणी रजिस्टर पूर्ण झाल्याची माहिती बाहेर पडली आहे
No comments