मुरबाड बदलापूर बस सेवा विस्कळीत शालेय विद्यार्थी नागरिकांची उडाली तारांबळ;एसी बस बसनात नागरिकांचा संताप
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्याला एसी बसेस मिळणार असा गव-गवा होता मात्र मुरबाडकरांच्या नशीबी भोपळाचा आल्याचे चित्र दिसत आहे.मुरबाड-बदलापूर शटल सेवा विस्कळीत झाल्याचे नागरिकांनी आमच्याशी बोलताना सांगितले.बदलापूर मुरबाड असा शालेय विद्यार्थी नागरिक महिलावर्ग कामावर जाणार्यांचा प्रवास असतो मात्र मुरबाड बदलापूर शटल सेवा बसनात गुंडाळल्याचे चित्र दिसत आहे.मुरबाड बदलापूर बस सेवा विस्कळीत झाल्याचा रोष नागरिक शालेय विद्यार्थी यांच्या मुखातून निघत आहे.
चौकशी कक्षात चौकशी करायला जायाचे मात्र चौकशी अधिकारीच येथे बेपत्ता असल्याचे दिसत आहे.मुरबाड सारख्या ग्रामीण भागाला विकासाची चालना मिळत असताना एकीकडे मात्र शालेय विद्यार्थी चाकरमानी नागरिक महिलावर्ग यांचे होणारे हाल कमी बसेस सेवा आणि त्यावर अधिकार्यांचे उडवाउडवीचे उत्तर मात्र नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत.लवकरात लवकर मुरबाड बदलापूर बस सेवा सुरळीत करा अन्यथा उग्र आंदोलन छेडला जार्इल अशी संतप्त प्रतिक्रिया शालेय विद्यार्थी चाकरमानी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
No comments