पद्माकर लहाने यांची ठाणे जिल्हा परिषद बांधकाम विभागात नियुक्ती
ठाणे : महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वसाधारण बदली आदेशानुसार पद्माकर लहाने यांची जिल्हा परिषद, ठाणे येथील बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता या पदावर बदली झाली आहे.आज, दिनांक १८ जून, २०२५ रोजी लहाने यांनी जिल्हा परिषद, ठाणेच्या बांधकाम विभागात नियमितपणे हजर राहून पदभार स्वीकारला आहे.
यापूर्वी ते मंत्रालय, मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात अवर सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या बदलीने ठाणे जिल्ह्यातील विकासात्मक बांधकाम योजनांना अधिक गती आणि कार्यक्षमतेची जोड मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी लहाने यांचे स्वागत करत नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments