web-banner-lshep2024

Breaking News

शेतकऱ्याला लोकवर्गणीतून दिली बैल जोडी..!

नामदेव शेलार / मुरबाड : तालुक्यातील केळेवाडी येथे शुक्रवार दि.६जून २०२५ रोजी वीज पडल्याची घटना घडली होती.या मध्ये केळेवाडी येथील शेतकरी  गोविंद तुका खाकर यांनी आपले बैल शेतावर घेऊन गेले होते.संध्याकाळी घरी येताना बैलावर वीज पडल्याने चार बैल मृत्यू पावले होते.शेतकरी फार खचून गेला होता.सरकारी मदत कधी मिळेल याची वाट पाहत बसण्यापेक्षा लोकवर्गणीतून या शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून जि..ठाणे उपाध्यक्ष,जनसेवा प्रतिष्ठान मुरबाड अध्यक्ष सुभाष पवार यांच्या पुढाकाराने बैल जोडी खरेदी करून दिली आहे.

  ठाणे- पालघर सहकार बोर्ड संचालक प्रकाश पवार सर जि..ठाणे माजी सदस्य संजय पवार,समाजसेवक रघुनाथ खाकर,बंडू पवार,विलास घरत यांनी पुढाकार घेतला आणि व्हाट्सअप गृपला मेसेज टाकला आणि विशाल (बाळा) घरत,गणेश वारघडे, एपिआय विनायक गोल्हे,संतोष देशमुख, महेश पवार,पांडुरंग दरवड, ऍड विलास ठाकरे,मंगल निमसे, चेतन मानधणे,मोहन घोलप,शिवाजी राऊत,कमलाकर पवार,सुनीलभाई देशमुख,विजय थोरात,कैलास घरत, विठ्ठल म्हाडसे,अरुण भोईर व अनेकाने थोडे थोडे पैसे जमा केले व या पैशातून बैल जोडी शनिवारी १४ जून २०२५ रोजी शेतकरी गोविंद तुका खाकर यांना गावात नेऊन दिली.या वेळी प्रकाश पवार सर, रघुनाथ खाकर सर,बंडू पवार, विलास घरत, सुभाष दादा पवार यांचे पि ए संतोष मोरे, शेतकरी तुकाराम खाकर, माजी उपसरपंच बुधाजी पोकळा,नाना खाकर,नवसू पोकळा,हिरामण खाकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments