जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांना मालमत्ता करात ५० टक्के सूट;भादाणे ग्रामपंचायतीकडून सवलत
भिवंडी : सकारत्मक वातावरण मराठी शाळांमधील घटती पटसंख्या लक्षात घेता मराठी शाळा वाचवणे आणि टिकवणे गरजेचे झाले आहे. असे असताना तालुक्यातील भादाणे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांना मालमत्ता करात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शालेय प्रवेशासाठी घरपट्टीत सवलतीचा निर्णय घेतला आहे. भादाणे ग्रामपंचायत हद्दीत भादाणे, आतकोली, जूपाडा, चिंबीपाडा, शेरेकरपाडा या गावांचा समावेश होता. ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेचे भवितव्य टिकविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण व्हावी, या उद्देशाने शिक्षणाबद्दल निर्माण होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच ज्योत्स्ना भालेकर यांनी दिली आहे.
प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या पाल्याच्या पालकांना घर, पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तर पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड व संवर्धन होण्याची वृत्ती वाढीस लागावी, यासाठी इयत्ता पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी पाच रोपे लागवडीसाठी दिली जाणार आहेत. तसेच झाडांची चांगली निगा राखणाऱ्या पालकांना पुढील वर्षात घर तसेच पाणीपट्टी करामध्ये ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपसरपंच मेघा भोईर यांनी दिली आहे.
No comments