web-banner-lshep2024

Breaking News

आतकोली डम्पिंग ग्राउंडवर दगडखाणी मधून सरकारी समझोता डझनभर आजी-माजी आमदार खासदार राजकीय नेत्यांच्या आंदोलनाचा उडाला फज्जा;शासनाची 87 एकर जमीन केली गिळगुत..!

नामदेव शेलार/ भिवंडी : महसूल विभागाची गुरचरण 87 एकर शासकीय जमीन डम्पिंग ग्राउंड च्या नावाखाली काही ठेकेदार प्रोजेक्ट धारकांनी घेऊन तेथे चक्क दगड खाणीचा व्यवसाय सुरू केला आहे मौजे आतकोली पठारावर उभारण्यात येणाऱ्या डम्पिंग ग्राउंड ला काही अधिकाऱ्यांनी अवैध्यरित्य दगड खाणी चालवणारे दगड मातीची रॉयल्टी चोरी करणाऱ्या सोबत समझोता करून अवैद्यरित्य दगडखाणी सुरू केले आहेत आतकोली पठारावरील 87 एकर जमीन स्थानिक गावकरी शेतकरी ग्रामपंचायत यांना

 डावळून ठाणे महानगरपालिकेला दिली आहे त्या विरोधात आतकोली, भादाने, पिसे ,चिराडपाडा, तळवली, आमने ,वाशेरे ,पडघा परिसरातील शेकडो लोकांनी उग्र आंदोलन केले होते डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील स्थानिक आमदार शांताराम मोरे खासदार बाळ्या मामा मात्रे आमदार किसन कथोरे शिवसेना नेते प्रकाश पाटील काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्यासह विविध पक्षाचे तालुकाप्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला मोठी मोठी भाषणे ठोकून डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही अशी डरकाळी फोडली असताना आतकोली डम्पिंग ग्राउंड राजरोसपणे सुरूच आहे.

डम्पिंग ग्राउंड अधिकाऱ्यांनी स्थानिक आंदोलनाचा खर्च करून विरोध करणाऱ्या अनाधिकृत दगडखानी चालवणाऱ्यांसोबत छुपा करार करून तुम्ही दगड माती घेऊन जावे आम्हाला कचरा टाकण्यासाठी खड्डे करून द्यावे अशी डील झाल्याचे सांगण्यात येते परंतु अवैध्य दगडखानी माती वाहतुकीला महानगरपालिकेने रॉयल्टी चा टेंडर काढून जमीन दिली काय यावर अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही महसूल अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवून कोटी रुपयांची रॉयल्टी चोरी अवैद्य दगडखाणी चालकांनी केली आहे.

आतकोली डम्पिंग ग्राउंड विरोधात हजारो स्थानिक नागरिक उग्र आंदोलनात सामील झाले होते त्यांची दिशाभूल करून स्वार्थ संधी साधू अवैद्य दगड खाणी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक लोकांनी शासनाकडे केली आहे. आतकोली डम्पिंग ग्राउंड शासकीय जमिनीमध्ये तसेच आजूबाजूला बेकायदेशीर दगड खाणी सुरू आहेत सुरुग स्फोटकाची पेरणी करून स्फोटाचे आवाज नागरिक शेतकऱ्यांना भयभीत करत आहेत.

आतकोली भादाने तळवली ग्रामपंचायतच्या हद्दीत सर्व अवैद्य दगड खाणी चालवणाऱ्यांचा "आका" कोण असा सवाल केला जात आहे महसूल विभागाची गुरचरण जमिनीवर गेले दहा वर्षापासून लाखो ब्रास दगड मातीची चोरी केली आहे महसूल विभागाने यापूर्वी अनेक दगड खाणी चालवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून ठाणे महानगरपालिका,व महसूल अधिकाऱ्यांनी आठ महिन्यापूर्वी अवैद्य दगड माती चोरट्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केले आहे त्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत.

आतकोली पठार दगड खान चालकांचा गुन्हेगारी अड्डा बनला आहे पोलुशन बोर्ड महसूल विभागासह सर्व संबंधित यंत्रणेला माहिती असताना कारवाई होऊन दगड खाणी बंद होत नाहीत हा स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत दगडखान चालकांना विद्युत पुरवठा कुठून होतो स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचे रस्ते बंद करण्यात आले आहेत प्रदूषण पर्यावरणाला धोकादायक असणाऱ्या दगड खाणी चालवणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याची चर्चा आहे. आतकोली पठारावरील डम्पिंग ग्राउंड बंद करून ग्रामपंचायतच्या कब्जावहिवाटीला असणारी 87 एकर जमीन परत मिळावी डम्पिंग ग्राउंड रद्द करावे यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे परंतु डंपिंग ग्राउंड अधिकाऱ्यांनी स्थानिक दगड खाणी चालवणाऱ्यांना दगड मातीचे उत्खनन करण्याची मुभा देऊन ग्रामस्थ शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.अशा दगड माती चोरी करणारे स्फोटक पद्दार्थ वापरून लोकांचे जीव घेणाऱ्याना मोकोका कायद्याने कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गात होत आहे

No comments