web-banner-lshep2024

Breaking News

सैनिकांचे अभिनंदनात्सव मुरबाड मध्ये आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली...!

 

नामदेव शेलार / मुरबाड :  भारत पाकिस्तान युद्धात भारतीय सीमेवरील सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला त्या सैनिकांना सलाम करून अभिनंदनात्सव साजरा करण्यासाठी मुरबाड भाजपा आमदार किसन कथोरे (Mla Kisan Kathore) यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

तीन हात नाका येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तिरंगा रॅली काढून कुणबी समाज हॉलमध्ये कार्यकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन केले पाकिस्तान दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती महिलांचा सिंदूर पुसलं होतं त्याची चीड देशाच्या पंतप्रधानांना आली देशासाठी सर्व देशवासीय जात-पात धर्म पक्ष विसरून एकत्र आल्याने भारताच्या महिला सैनिकांनी पाकिस्तान मध्ये घुसून पाकच कंबरड मोडलं देशात भारताचा धबधबा निर्माण केला त्याच सैनिकांचा उत्साही बळ वाढवण्यासाठी मुरबाड मध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीत आमदार किसन कथोरे यांच्यासह भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा गट अशा विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था कार्यकर्ते नागरिक सामील झाले होते पाकिस्तानने भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचे काम केल्यास पार्कला जशास तसे उत्तर मिळेल असे आमदार किसन कथोरे यांनी इशारा दिला तिरंगा रॅलीत पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे संरक्षण मंत्री गृहराज्यमंत्री यांनी युद्धात घेतलेले निर्भीड ठाम भूमिकांने देश वासियांच्या आनंद भावना पलावीत झाल्या आहेत.

No comments