मुरबाड मध्ये स्कुटीवरील गुटखा,गांजा विक्री कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
ठाणे,विशेष प्रतिनिधी : मुरबाड मध्ये अवैध धंदयावर पोलिस यंत्रणेची करडी नजर जरी असली तरी यंत्रणेच्या नजरेखालून अवैध धंदे जोमाने सुरू आहेत.मुरबाड मध्ये स्कुटीवर गुटखा विक्री केला जात असल्याची खात्रीलायक वृत्त असून हा गुटखा साठा मोठया प्रमाणात मुरबाड तालुक्यासह शहरात वावरत आहे.
मुरबाड देविची आळी ,देवगांव फाटा, वाणीआळी ,मातानगरसह अन्य परिसरातील मोठया किराणा दुकानासह घरातून विक्री होत आहे.चक्क स्कुटीवर हा गुटखा विक्री मोठया प्रमाणात होत आहे.सदरील गुटखा, गांजा हा हप्तेबाजीने सुरू असल्याचे नागरिकांकडून चर्चा होत आहे.या गुटखा, गांजाचा शोध मात्र लावण्यास यंत्रणा कुठे तरी अपयशी पडत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.



No comments