web-banner-lshep2024

Breaking News

पिंपळास गावच्या सरपंचपदी सुजाता म्हस्के यांची बिनविरोध निवड


भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळास ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन भोईर यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता, त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी रविवारी निवडणूक अधिकारी ए. पी. बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी गणेश वाढविंढे यांच्या विशेष उपस्थित निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी सुजाता म्हस्के यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी ए. पी. बडगुजर यांनी सुजाता कल्पेश म्हस्के यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांचे समर्थक, आप्तेष्ट, नातेवाईक, कुटुंबीय व मित्रमंडळींनी फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवून व घोषणा देऊन एकच जल्लोष व आनंद साजरा केला. तसेच त्यांची ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणुक संपुर्ण गाव परिसरातून वाजत गाजत काढण्यात आली. 

       यावेळी नवनिर्वाचित सरपंचना शुभेच्छा व शुभाशीर्वाद देण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद बांधकाम समिती माजी सभापती कुंदन पाटील, माजी पं. स. सभापती विकास भोईर, माजी पं. स. सभापती भानुदास पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष पी. के. म्हात्रे, माजी पं. समिती सदस्य गिरीश म्हात्रे, माजी पं. समिती सदस्या पुष्पा पाटील, शिवसेना उप तालुका प्रमुख मोहन गायकवाड, माजी शिवसेना विभाग प्रमुख शार्दुल म्हात्रे, शिवसेना विभाग प्रमुख सुनील ठाणगे, शिवसेना शिंदे गट महिला तालुका अध्यक्षा सुषमा माळी, माजी शिवसेना शाखा प्रमुख इंद्रबाळ जोशी,समाजसेवक नरेश म्हस्के, समाजसेवक कैलास म्हस्के, पोलीस पाटील अशोक जाधव, भाजपा शाखाध्यक्ष विकास म्हात्रे, शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख शिवाजी म्हात्रे, भाजपा युवामोर्चा शाखाध्यक्ष उपेश म्हस्के, शिंदे गटाचे सुभाष म्हस्के, युवासेना विभाग अधिकारी विकी मुकादम, माजी उपसरपंच घनश्याम भोईर, माजी उपसरपंच छञपती कोळी, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील, समाजसेवक काळीराम भोईर, समाजसेवक सतीश पाटील, समाजसेवक अजय पाटील, कट्टर शिवसैनिक दीपक म्हात्रे, पोलीस मित्र अजित म्हात्रे, समाजसेवक दिलीप जाधव,विश्वास भोईर, रमेश पताळे, अजय भोईर व आजी माजी सरपंच, उपसरपंच, मित्रमंडळी, नातेवाईक व भाजपा शिवसेना (उबाठा)  पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याच बरोबर मावळत्या सरपंच कांचन भोईर, उपसरपंच विलास गुरुडे, माजी सरपंच सोनाली चौधरी, मीना कोळी, योगिता पाटील, कोमल म्हस्के, संजय घरत, परुनाथ म्हात्रे, कांचन भोईर, विशाल पाटील या सर्वांनी उपस्थित राहून निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्यामुळे नवनिर्वाचित सरपंच सुजाता म्हस्के यांनी सर्वांचे आभार मानून गावाचा विकास करतेवेळी सर्व सदस्य व ग्रामस्थांना जोडीला व विश्वासात घेऊन गावातील विकासकाने करीन, सर्वात आधी गावातील सर्व महिलांची सभा घेऊन त्यांच्या अडी अडचणी जाणून घेईन, त्यानंतर गावातील अंतर्गत कामे व प्रलंबित कामे लवकर मार्गी लावेन, तसेच माझ्या सरपंच काळात गावातील ज्या ज्या घरात पहिली मुलगी जन्माला येईल त्या मुलीचा सुकन्या योजनेचा स्वखर्चाने मी मुलीच्या नावे पोस्टात खाता उघडून देईन व तीच्या नावे बँकेत पाच हजार जमा करेन , तसेच पिंपळास रेतीबंद गणेश घाट येथील दशक्रिया विधी हॉल मधे पत्रा शेडचा प्रयत्न करून चेंगिंग रूम व सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेन, कोन रोड पिंपळास हद्दीत कमानी बांधण्याचा प्रयत्न करेन, पिंपळास गावच्या हद्दीचा विषय सोडवण्यासाठी पाठपुरावा करेन तसेच जागा व निधी उपलब्ध झाल्यास गावातील महिलांच्या शारीरिक विकासासाठी स्वतंत्र व्यायाम शाळा, महिला बचत गटांच्या ग्रामसंस्थेतील महिलांना उठण्या बसण्यासाठी व सार्वजनिक छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी छोटासा कार्यालय बांधण्याचा प्रयत्न करेन, मंगळ कार्यालय, समाजगृह यासाठी देखील प्रयत्न करेन, गावातील तरुण खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानासाठी देखील प्रयत्न करेन, जि. प. शाळेसाठी साहित्य व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन, महिला सक्षमीकरण, सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेन, तसेच शासकीय योजनांचा पाठपुरावा करून त्या सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन तसेच दर १५ दिवसांनी प्रत्येक प्रभागात सरपंच आपल्या दारी ही योजना राबवून महिलांना भेडसावणाऱ्या पाणी व कचऱ्या संदर्भात महिला व नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन असे नवनिर्वाचित सरपंच सुजाता म्हस्के यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

--------------------------------------------------------------

माझ्या सरपंच काळात ज्या घरात पहिली मुलगी जन्माला येईल तिचा बँकेत सुकन्या योजनेचा  स्वखर्चाने खाते उघडून मुलीच्या नावे पाच हजार रु. बँकेत जमा करणार _ सुजाता म्हस्के 


No comments