web-banner-lshep2024

Breaking News

रेन्बो सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलचा 100 टक्के निकाल..!

मुरबाड : आज 10 वी बोर्डाचा निकाल ऑनलाईन प्रणालीद्वारे घोषित झाले असता ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील आयएसओ नामांकन असलेली एकमेव ऋणानुबंध सामाजिक संस्था संचलित रेन्बो सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाड या शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे.

   गेल्या अनेक वर्षापासून या शाळेत विद्दयार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून उज्ज्वल भविष्याची वाटचाल येथून चांगल्या प्रकारे यश संपादन करून केली असता नेहमी 100 टक्केचा निकाल या शाळेतुन अग्रस्थानी राहिला आहे.ती जणू परंपराच राहिली असून हीच परंपरा यावर्षीही विद्दयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून कायम ठेवली आहे.या शाळेचा यावेळी 100 टक्के निकाल लागला असून या शाळेत प्राजक्ता रमेश शेलवले हिने 95.40 टक्के घेऊन प्रथम क्रमांक मिळविले तर समृध्दी अरूण गोंधळी हिने 94.80 टक्के घेत द्वितीय तर साईश नामदेव कुंभार याने 93.45 टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.

    गरिबातील गरिब मुलांनी येथे शिक्षण घ्यावे या दृष्टिकोणातून या शाळेचे संस्थापक तथा प्राचार्य पंढरीनाथ बुधाजी टोले सर यांनी शिस्तबध्द शाळा काढली आणि खर्या अर्थाने संस्कारमोती देऊन शिस्तीने विद्दयार्थी घडविले देखील.विद्दयार्थ्यांच्या या यशस्वीला येथील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली त्यामुळे सर्वच पालकांनी या शाळेचे प्राचार्य,शिक्षक वर्ग,स्टाफ कर्मचारी यांचे आभार मानले असून पंढरीनाथ टोले सरांनी यशस्वी भवः विद्दयार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments