मोहिनी ज्ञानेश्वर पालवी 81.80 टक्के घेऊन गाठले गरूडझेप;दहावी परीक्षेच्या निकालात मुलींची वाढती टक्केवारी समाधानकारक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गौरव शेलार / ठाणे : गरिबीची परिस्थिती आणि आई-वडिलांच्या मेहनतीची जाण असलेली त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना जिद्द,चिकाटी,धाडसी शैली सोबत घेऊन मोहिनी ज्ञानेश्वर पालवी हि 10 वी बोर्डाच्या परिक्षेत बसली होती.अंधारात अभ्यास करून परिक्षेत उजेड निर्माण करून चक्क 81.80 टक्क्यांनी यश संपादीत केले.तिच्या या कौशल्याने सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे.
यावेळीही मुलांच्या 10 वी बोर्डात यशाच्या टक्केवारीकडे पाहता यंदाचीही बाजी मुलींनी मारली असल्याने ठाणे जिल्हयातील कल्याण तालुक्यातील खडवली येथील राहणारी मोहिनी हिची आई मुक्ता पालवी व ज्ञानेश्वर पालवी हे अपार कष्ट करित असताना त्या कष्टाला आज खर्या अर्थाने गौरवशाली अभिमान मोहिनीने मिळवून दिला आहे.मोहिनी पालवी हिने यश संपादीत केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दहावीच्या परीक्षेत मुलींच्या यशाची वाढती टक्केवारी ही समाजातील सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुली आत्मनिर्भर बनत असून, हे यश त्यांच्या परिश्रम आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याला दिलेली पावती आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
No comments