संघटन चळवळीतील वटवृक्ष ग.दि.कुलथे अनंतात विलीन राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी भावना केल्या व्यक्त
ठाणे : राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार श्री.गणपत दिनकर कुलथे, यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या नेरुळ येथील राहत्या घरी काल दि.14 एप्रिल रोजी रात्री 9.00 वाजता निधन झाले. आज त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नेरूळ येथील शांतीधाम येथे श्री.कुलथे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुलथे कुटुंबियांसमवेत विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, राजपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष रवींद्र धोंगडे, विद्यमान अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, दुर्गा मंचच्या अध्यक्षा डॉ.सोनाली कदम, माजी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ आदींनी यावेळी स्वर्गीय श्री.कुलथे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित सर्वांनी स्वर्गीय ग.दि.कुलथे यांचे संघटना चळवळीतील राहिलेले अपूर्ण कार्य त्याच तडफेने, प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा संकल्प करून स्व. श्री.कुलथे यांना श्रद्धांजली वाहिली.



No comments