web-banner-lshep2024

Breaking News

उष्णतेची आग विझवण्यासाठी पर्यटकांची खडवली नदीवर तूटुंब गर्दी..!


नामदेव शेलार/ मुरबाड : मुरबाड सह परिसरात दररोज 40 ते 46% उष्णतेचा पारा नोंदला जात असून लहान मुले नागरिकांची नदी पर्यटन स्थळे परिसरात गर्दी वाढत आहे अशीच गर्दी खडवली नदीवर होऊ लागली असून मुंबई ठाणे भिवंडी कल्याण वासिंद सह परिसरातील नागरिक महिला मुलांसह खडवली नदीवर आंघोळीसाठी येत आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसारा पासून उल्हासनगर कल्याण ठाणे, मुंबई टिटवाळा खडवली आसनगाव कसारा रेल्वे गाड्यांना तुफान गर्दी होत आहे.

खडवली नदीमध्ये भातसा धरणाचे पाणी पिसा डॅम धरणासाठी सोडले जाते कधी कधी पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटकांना जीव गमवावा लागतो खडवली नदीमध्ये हजारो पर्यटक पाच किलोमीटर अंतरावर नदी पात्रात उतरले असताना काही ठिकाणी नदीचे पाणी पात्र खोल असल्याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला असल्याच्या घटना घडल्या असून प्रत्येक उन्हाळ्यात खडवली नदी परिसर पर्यटकांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. 

पोलिसांना खडवली नदीवर उन्हाळ्यात अधिक सतर्क रहावे लागत आहे खडवली नदी पात्रातच महिलांना कपडे बदलण्यासाठी छोट्या छोट्या झोपड्या तयार केल्या असून नदीलगत खानावळी हॉटेल उभारले आहेत. खडवली नदी लगत ज्येष्ठ नागरिकांचा आश्रम असून नदीच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात जंगलाचा भाग असून खडवली रेल्वे स्टेशन लगत असलेल्या खडवली पर्यटन स्थळावर मार्चपासून जून पर्यंत पर्यटकांची गर्दी राहते. 

शाळा कॉलेज यांना सुट्ट्या लागल्याने शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आंघोळीसाठी पिकनिकला येतात रिक्षा मोटरसायकल फोर व्हीलर वाहनांची गर्दी नदी किनारी होते खडवली नदी परिसर हळूहळू वाढत्या वस्तीचा पर्यटन स्थळ झाला असून देशातून राज्यातून रेल्वेते येथे लोक येऊन राहू शकतात असा घडवली पर्यटन स्थळ गर्दीने फुलला आहे.

No comments