कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात अपघातात दोन जणांचा मृत्यू
मुरबाड : म्हसा मुरबाड रस्त्यावरील पुनर्वसित तोंडली २ गावा जवळ क्रेटा कार व मोटरसायकलचा भीषण अपघात झाला या मध्ये मोटारसायकल वरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिनांक १६ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास म्हसा गावाकडून मुरबाडच्या दिशेने म्हसा मुरबाड रस्त्या वरुन येणारी क्रेटा कार व एका मोटरसायकल मध्ये भीषण धडक झाली या मध्ये मोटारसायकल वरील सासणे टेपाचीवाडी येथील दीपक ठाकरे याचा जागीच मृत्यू झाला तर जयवंत खुटारे याचा उपचारा साठी दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. या बाबत मुरबाड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



No comments