web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड वरून शहापूरच्या दिशेने निघालेल्या बसचा मुरबाड कुडवली येथील आयटीआय जवळ अपघात

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाडवरून शहापूरच्या दिशेने निघालेल्या महामंडळ बसचा मुरबाड कुडवली येथील आयटीआय जवळ अपघात झाला आहे.हया अपघातात सुमारे चालक कंडाक्टरसह 18 प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर मुरबाड ग्रामीण रूग्णालय येथे डॉ.संग्राम डांगे ,डॉ.विश्‍वकर्मा ,डॉ.स्वप्नील वाकचौरे ,डॉ.सुतार व येथील कर्मचारी हरडभाऊ ,तानाजीभाऊ भाईर ,संदीप पष्टे व इतर कर्मचारी डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत. 

  सदरील घटना बस ड्रायव्हारने सांगितली की बसची स्टेअरींग ऑटोमेटीक लॉक झाली व बस पलटी झाली.आम्ही गेल्या आठवडयात मुरबाड बस आगाराबाबत वृत्त प्रसिध्द केल्या होत्या की आगारातील बस हे कमकुवत असून त्या नेहमी रस्त्यावर बंद अवस्थेत दिसून येतात कधी अनूसुचित प्रकार घडू नये यासाठी सरकारने याकडे लक्ष घालावे असे वृत्त प्रसिध्द होत असतात मात्र सरकारला वेळ मिळत नाही हे या घटनेतुन दिसून येत आहे.सदरील मुरबाड बस आगाराला 15 ते 20 एसी बस नवीन येणार असे घोषणा झाली होती मात्र हया बस कुठे गायब झाल्या हे मात्र गुलदस्त्यात आहे.

No comments