सुशील पालीवाल यांना डॉक्टरेट पदवी प्रदान;शरदचंद्र पवार फार्मसी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!
ओतुर :श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील ऑफिस सुप्रीटेंडंट डॉ.सुशील पालीवाल यांना एम.जी.एम युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाकडून मॅनेजमेंट सायन्स या क्षेत्रामध्ये नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश दामा यांनी दिली.
डॉ.सुशील पालीवाल यांनी औषध निर्माण शास्त्रातील शिक्षण सेवा गुणवत्ता पडताळणी विषयावर सखोल अभ्यास करून अतिशय मेहनतीने डॉक्टरेट पदवी मिळवली आहे असे डॉ. सुमित जोशी यांनी सांगितले. एम.जी.एम विद्यापीठाकडून डॉक्टर रेट मिळवणे ही संस्थेसाठी व महाविद्यालयासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे व संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे यांनी दिली. महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी अशा सर्व स्तरांतून डॉक्टर सुशील पालीवाल यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



No comments