जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते 120 दुचाकी चालकांना हेल्मेटसचे मोफत वाटप
ठाणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे, आवास फायनान्स लिमिटेड, राजस्थान सडक सुरक्षा सोसायटी आणि स्टीलबर्ड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.12 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तसेच कोषागार कार्यालयामधील एकूण 120 दुचाकी चालकांना हेल्मेटसचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेश कोलुंगाडे, जितेन कपानी, डॉ.वैभव ठाकरे यांचे सहकार्य लाभले.यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व आस्थापनांवरील दुचाकी चालविणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रकाद्वारे कळविले आहे.



No comments