web-banner-lshep2024

Breaking News

मोहोप गावाची गावठाण जमीन हडप करणाऱ्यावर कारवाईसाठी समाजसेवक लक्ष्मण कृष्णा दळवी यांचा आत्मदहनाचा इशारा..!

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील मोहोप गावाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात मिळालेला गावठाण जमिनीवर काही धनदांडग्यांनी अतिक्रमण करून गावठाण गिळगुत केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सरकारी पडीत जमीन सरकारने शासन जमा करावी अन्यथा आत्मदहन करेल असा इशारा समाजसेवक लक्ष्मण कृष्णा दळवी यांनी तहसीलदार,गटविकास अधिकाऱ्यांना 10 मार्चला लेखी अर्जद्वारे दिला आहे. मोहोप गावठणाच्या जमिनीचे सातबारा उताऱ्यावर सरकारी आकारी पडीत जमीन म्हणून उल्लेख असून सदर जमीन मोहोप गावाचा गावठाण आहे. या जमिनीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साक्ष असल्याचे लक्ष्मण दळवी सांगत आहेत. 
 
  गेली दहा ते बारा वर्षांपासून या गावठाणा विरोधात लक्ष्मण दळवी आवाज उठवत आहेत सरकारी जमिनीची मोजणी सुद्धा झालेली आहे. शासकीय जमिनी स्थानिकांना शासनाने कोणत्या नियमानुसार दिले आहेत त्याची सत्यता समोर आलेली नसल्याने मोहोप गावाचा गावठाण वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. याच गावठाण जमिनीचा मुद्दा राज्याच्या 2022 च्या अधिवेशनात लक्षवेधी म्हणून समोर आला होता तेव्हापासून शासकीय पातळीवर तक्रारी अर्ज करून लक्ष्मण दळवी लढा देत आहेत. 
 
    पडीत गावठाण सरकारी जमिनीवर भात शेती घरे असल्याचे बोलले जात असताना शासकीय कार्यालयातून हे गावठण कोणाला देण्यात आले त्यांची नावे शासकीय सातबारा उतारावर आलेली नाहीत त्यामुळे शासनाचे निकषाचा फायदा श्रीमंतांना होत असल्याचा आरोप लक्ष्मण दळवी यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहोपचे गावठाण असलेली जमीन लोकांना घरे बांधण्यासाठी दिली होती असे लक्ष्मण दळवी यांचे म्हणणे आहे त्याची चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दळवी यांनी दिला आहे.

No comments