घोडदेश्वर शिवमंदिरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी;भक्तांना फराळाचे वाटप
नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील घोडदेश्वर
,संगमेश्वर,सासणेसह विविध ठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला
यावेळी हजारो भक्तांनी शिवशंभूची पूजा केली मुरबाड एमआयडीसी मधील घोडदेश्वर
शिवमंदिरात जैन मंदिर येथील शिवमंदिरात हजारो भक्तांनी पहाटेपासून पूजा
केली भक्तांना मंदिर ट्रस्टीने फराळाचे वाटप केले.
भक्तांना दर्शनासाठी
सुरक्षितता पुरवण्याचे काम समाजसेवक शिवभक्त बाळा शेलार,बंटी तेलवणे, जुगल जाखोटिया सर,विजेंद्र देहरकर,दवणे बुवा,रोशन म्हात्रे तसेच
मुरबाड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोख सुरक्षा दिली.विविध
प्रकाराचे दुकाने उभारल्याने येथे यात्रेचे स्वरूप आले होते भजन हरिपाठ
भक्तिमय कार्यक्रमाने घोडदेश्वर मंदिर ट्रस्टी जगदीश पाटील आत्माराम शिंदे
सासे रोकडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली भक्तांना
सर्व युक्त सुविधा पुरवल्या.



No comments