मासिक सभेचा बेकायदेशीर ठराव ग्रामविकास अधिकारी यांना भोवणार?
भिवंडी - भिवंडी तालुक्यातील पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नं. ११ मधील गुरुचरण जमीन विकासक मोहित भरत पाटील यांच्या फायद्यासाठी व त्यांच्या गोडाउनला रस्ता बनविण्याच्या नावाखाली विकसित करण्यास पिंपळास ग्रामपंचायतीच्या वतीने नियमांची पायमल्ली करून ६००x४५ चौ. फूट मोज मापाचा रस्ता बनविण्यासाठी ग्रामसभेत ठराव न घेता मासिक सभेचा बेकायदेशीर ठराव घेऊन जवळ जवळ 25 गुंठे एवढी जमीन विकासकास परस्पर विकसित करण्यास देण्यात आली होती.
या प्रकरणात लाखो करोडोंची आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचा शेतकरी संघटनेने गंभीर आरोप केला असून संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी भिवंडी, उपविभागीय अधिकारी कार्यालय भिवंडी, तहसीलदार कार्यालय भिवंडी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणे यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या,
ग्रामपंचायत पिंपळास हद्दीतील सर्वे नंबर ११ मधील शासकीय/ गुरुचरण जमिनीवरील बेकायदेशीरपणे उत्खननना बाबत महसूल संहिते प्रमाणे कारवाई न करणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ६० अन्वये ग्रामपंचायतीचा सचिव या नात्याने आपली जबाबदारी पार न पाडणे तसेच सदर जागेसंबंधीत शासकीय नियम न पाळता मासिक सभेचा बेकायदेशीरपणे ठराव केले असल्याचा ठपका ठेऊन सदर तक्रारीच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी नितीन देशमुख यांची चौकशी करण्यात आली असता कामकाजामध्ये अनियमितता केल्याचे निदर्शनास आल्याने या गैरशिस्तीच्या वर्तनामुळे व कामकाजात सचोटी व कर्तव्य पारायणता ठेवलेली नाही. सचिव या नात्याने जबाबदारी पार न पाडुन कर्तव्याचे पालन केलेले नाही, पर्यायाने नियमांचे उल्लंघन करुन ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख हे कारवाईस पात्र ठरले असुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांना खुलासा सादर करण्याबाबत संधी दिली होती, मात्र त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याचे जिल्हा परिषदेने त्यांचा खुलासा फेटाळला असुन देशमुख यांच्यावर आता टांगती तलवार आहे.
सहाय्यक आयुक्त कोकण विभाग हे आता ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांची पुन्हा चौकशी करणार असुन त्यांनी योग्य खुलासा सादर न केल्यास नितीन देशमुख यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे. दरम्यान नितीन देशमुख यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणारी भुमीपुत्र शेतकरी संघटना पिंपळास यांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी केलेला हा एकच भ्रष्टाचार नसुन पिंपळास गावातील गाव तलाव मधील उत्खनना बाबत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गाळ काढण्याच्या नावाखाली गौणखाणीज विक्री करून लाखोंचा गैरव्यवहार केला आहे.ग्रामपंचायत मधील ज्या महिला सदस्या आहेत त्यांच्या जागी त्यांचे पती ग्रामपंचायत मधील सर्व कारभार व व्यवहार हाताळत असुन आमच्या संघटने वेळोवळी आवाज उठवला आहे.
तसेच गावात अनेक शासकीय, गुरुचरण जमिनी असुन त्यातील अनेक जमिनी बाहेरील विकासकांच्या घशात घातल्या असुन २००५ ती२०१० या काळात बाहेरील विकासकांनी वरील जमिनी बळकावल्या त्या जमिनींवर अनेक अवैध व अनधिकृत बांधकामे उभी केली असुन ग्रामपंचायतीच्या वतीने २०२३/२४ सालामध्ये लाखोंचा अर्थपुर्ण गैरव्यवहार करून विकासकांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्यात आले आहेत, तसेच गावातील नागरिकांनी माहिती अधिकारात कोणत्याही प्रकारची माहिती मागितली असता माहिती दिली जात नाही, महत्वाची माहिती असेल तर टाळाटाळ केली जाते किंवा माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कारण ग्रामपंचायतीच्या वतीने बाहेरील विकासकांना अनधिकृत परवानग्या, बेकायशीर ठराव, परवाने, बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले गेले असून ग्रामस्थानी या विषयी जाब विचारला असता कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांना वाळवी लागली आहे तर अनेक कागदपत्रं गायब झाली असल्याचा सरपंच व सदस्यांच्या सहिनी लेखी उत्तर देण्यात आले असुन त्यांचा पंचनामा स्वतः ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्यांनीच केला असल्याने सर्व प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त बाहेरील विकासकांची खोटेनाटे झोल झपाटे झाकण्यासाठी ही कागदपत्रे जाणुन बुजून गायब केली असुन याची उच्चस्तरी चौकशी होणे गरजेचे असुन ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी अशा अक्षम्य चुका केल्या असुन त्यांचे निलंबन न करता त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे व या प्रकरणा मधे जे जे ग्रामपंचायत सदस्य, शासकीय अधिकारी दोषी आढळतील त्या सर्वांवर तातडीने कायदेशीर व कडक कारवाई करून पिंपळास ग्रामपंचायत बरखास्त करून ग्रामस्थांना देण्यात यावे.
-----------------------------------------------------------------
ग्रामविकास अधिकारी नितीन परशराम देशमुख यांना कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायती मधे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ च्या (१) अन्वये दी. १८/०८/२०२२ रोजी पत्र देउन निलंबित करण्यात आले होते.तरी देखील नितीन देशमुख यांनी पुन्हा बेकायदेशीर ठराव देउन पुन्हा लाखो करोडोंची अर्थपुर्ण गैरव्यवहार केला असुन देशमुख यांनी ज्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये काम पाहिले त्या ग्रामपंचायत मधील देशमुख यांच्या कामकाजाच्या कारभाराची चौकशी करून आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे आणि भ्रष्टाचार मध्ये दोषी आढळल्यास त्या सर्व घोटाळ्यांची वसुली करून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी वरिष्ठ पातळीवर मी पत्रव्यवहार करणार आहे.
जगदीश पताळे
अध्यक्ष : भुमीपुत्र शेतकरी संघटना पिंपळास



No comments