web-banner-lshep2024

Breaking News

ताडदेव मच्छीमार्केटचे शौचालय पालिका अधिकाऱ्यांनी तोडले;मच्छीविक्रेत्या महिलांची आगरी सेनेकडे धाव..!

रोहित शिंदे / नवी मुंबई  :     मुंबई सेंट्रल येथील रेल्वे ब्रिज नव्याने बनविण्याचे काम सुरु आहे. याठिकाणी ताडदेव मच्छिमार्केट असून कोळी समाजाच्या २० ते  २५ महिला मच्छीविक्रेत्या  आपला पारंपारिक मच्छी विकण्याचा व्यवसाय गेल्या ३ ते ४ पिढ्यापासून करीत आहेत. या मच्छीमार्केट मधील मच्छीविक्रेत्या महिला या महापालिका परवाना धारक आहे तसेच परवाना बॅच आहेत . 

सदर मच्छी मार्केट मधील साफसफाई व इतर खर्च येथील महिलाच वर्गणी काढून करीत असतात. याठिकाणी महिलांसाठी मुतारी व शौचालय बांधण्यात आले होते. २ दिवसापूर्वी महापालिका " डि " वार्डातील अधिकारी येथे येऊन मच्छीमार्केट मधील शौचालय पूर्णपणे तोडून जमीनदोस्त केले आहे. सदर अधिकाऱ्यांनी चुकून आमच्याकडून कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. डि विभागातील महापालिका अधिकाऱ्याकडून अशा चुकीच्या पद्धतीने शौचालय तोडल्यामुळे मच्छीमार्केट मधील कोळी मच्छीविक्रेत्या महिलांची शौचास जाण्यास दुसरी कुठलीही सोय उपलब्ध नसल्यामुळे गैरसोय निर्माण झाली असून महिलांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सदर महिलांनी आगरी सेना मुंबई अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी तक्रार केल्याने श्री. जयेंद्र खुणे यांनी मार्केटची पाहणी करून मच्छीविक्रेत्या महिलांची भेट घेतली. 
 
          महापालिका " डि " विभाग अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने तोडलेले शौचालय हे मुंबई सेंट्रल रेल्वे ब्रिज खालील बेलासिस ताडदेव मच्छीमार्केटमध्ये आहे. त्याच ठिकाणी नवीन सोयीनियुक्त शौचालय महानगर पालिकेने त्वरित बांधून द्यावे . अशी मागणी आगरी सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांनी मुंबई महापालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी साहेब व सहाय्यक आयुक्त " डि " विभाग यांच्याकडे केली आहे. यावेळी फिशरमेन अससोसिएशनचे मार्शल कोळी, आगरी सेना मुंबादेवी विधानसभा प्रमुख निलेश म्हात्रे,मुलुंड संपर्कप्रमुख किरण गवळी व अन्य मच्छी विक्रेत्या महिला उपस्थित होत्या.

No comments