साईबाबा पालखी सोहळ्यास सुरुवात ठाणे जिल्ह्यातील अधिक पालख्या शिर्डीकडे रवाना..!
गौरव शेलार / मुरबाड : दरवर्षीप्रमाणे ठाणे जिल्ह्यातून शिर्डी साईबाबांच्या चरणी दर्शनासाठी जाणाऱ्या साईबाबा पालख्या मोठ्या प्रमाणात रवाना झाले आहेत नोव्हेंबर पासून ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात साईबाबा पालखी सोहळा साजरा होत आहे.
उल्हासनगर शांतीनगर साईबाबा पालखी सोहळा 27 नोव्हेंबरला उल्हासनगर मधून रवाना होऊन कांबा मामनोली मधून मुरबाड येथे मुक्कामी असून दुसरा मुक्काम आश्रम शाळा मोरोशी माळशेज घाट मार्गे औतुर मार्गे शिर्डीला रवाना होत आहे
त्याचप्रमाणे मुरबाड बदलापूर भिवंडी कल्याण पडघा शहापूर या परिसरातील साईबाबा पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भक्तगण सामील होत आहेत महिला तरुणांचा सुद्धा पायी दिंडी सोहळ्यात सहभाग वाढत चालला आहे सकाळी थंडी दुपारी उन्हाच्या भरात अनेक भक्त पायात चपला बूट न घालता प्रवास करत आहेत.
No comments