थंडी,ताप,खोकला आजाराने मुरबाडकर हैराण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रांगा..!
नामदेव शेलार / मुरबाड : पावसाळा संपताच थंडीची चाहूल सुरू
झाली त्या हवामान बदलाने मुरबाड तालुक्यात थंडी ताप खोकला संधिवात रुग्णात
प्रचंड वाढ झाली असून दररोज शेकडो रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर
स्वप्नील वाकचौरे, डॉक्टर विश्वकर्मा ,डॉक्टर शेख अन्य डॉक्टर यांच्याकडून
तपासणी अंतिम उपचार केले जात आहेत.
मुरबाड माळशेज
घाट अभयारण्याच्या पायथ्याशी असल्याने येथे थंडीचा प्रमाण अधिक आहे
मुरबाडची म्हसा यात्रा संपल्यावरच येतील थंडी गायब होत असल्याचे जाणकार
वयोवृत्तांकडून सांगितले जात आहे.
मुरबाड तालुक्यात 214 महसुली गावे 150
च्या वर वाड्यापाडे असून सर्वात मोठी परिपूर्ण औषधांचा साठा असलेला मुरबाड
ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टर आहेत.दररोज विविध रुग्णांवर उपचार
तपासणीसह एक्स-रे काढण्यासाठी लोकांची गर्दी होते सर्वात जास्त रुग्ण
संधिवात,ताप,खोकला आजाराचे दिसून आले आहेत.
No comments