मुरबाडमधील जांभुर्डे व परिसरातील गावांना भूकंप सदृश हादरे
गौरव शेलार / मुरबाड : तालुक्यातील जांभुर्डे, खानिवरे, गवाळी, आंबेगाव, चिरड तसेच या गावांपासून १५ ते २० किमी दूर असणाऱ्या कर्जत तालुक्याच्या हद्दीतील खांडस येथेही हे हादरे जाणवल्याचे स्थानकांचे म्हणणे आहे. रात्री उशिरा अचानक जमिनीतून कंपन जाणवू लागल्याने या गावांमध्ये सद्या भीती पसरली आहे.खानिवरे व परिसरातील इतर गावांना भूकंप सदृश हादरे अनुभवायला मिळाल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे असून या भागात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या हादऱ्यांमुळे कोणतीही मोठी हानी घडली नसून काही घरातील मांडणीवरची भांडी पडली आहेत. तसेच काही ठिकाणी केवळ किरकोळ नुकसान झाल्याचे सांगितले जात आहेत. याप्रकरणी तहसिलदार अभिजित देशमुख यांनी भूकंप तज्ञ यांना संपर्क केला असल्याचे म्हणाले.
हा सौम्य भूकंप असून परिसरातील पाच ते सहापेक्षा अधिक गावांना हे हादरे जावणलेआहेत. प्रशासनाने याबाबत गंभीरपणे लक्ष देऊन लवकरच उपाययोजना आखली पाहिजे असे येथील स्थानिक सचिन भोपी यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.
No comments