मुरबाड मातानगर परिसरासह इतर ठिकाणी मटका क्लब जुगार अड्डा तेजीत अवैध धंदेवाल्यांसमोर प्रशासनाने टेकले गुडघे..!
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरात तीन चार ठिकाणी जुगाराचे क्लब अड्डे मटका धंदे जोमाने सुरू आहेत लाखो रुपये हप्ते देऊन अवैध धंदे सुरू असल्याने मुरबाड शहरात चोऱ्यांचा प्रमाण वाढला आहे गुंडगिरी वाढली आहे कायदा सुव्यवस्था डळमळीत झाली आहे. शहरातील अनेक दुकाने घरे फोडून चोऱ्या झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
मुरबाड तालुक्यात प्रशासन कमकुवत झाल्यावर अवैध धंदे तेजीत चालतात त्यामुळे गुन्हेगारी चोऱ्यामाऱ्या वाढतात याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे निवडणुका संपले आहेत अधिकाऱ्यांना कारणे सांगण्यास जागा नाही परंतु प्रामाणिक जनतेची सेवा सुरक्षा केल्यास अवैध धंदे बंद होतील अशी शहरवासीयांनी प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केली आहे शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील कारवाई केली जात नाही अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घातले जाते त्याचा फटका तालुक्यातील सामान्यांना बसत आहे.
No comments