भारताचं 'मिशन सीरिया'; 75 भारतीय नागरिकांना सुरक्षित काढले बाहेर काढले
सीरियातील सत्तेवर बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. बंडखोरांच्या ताब्यात असूनही अनेक ठिकाणी हिंसक हल्ले होत आहेत. सरकारी इमारती जाळल्या जात आहेत. लूटमार केली जात आहे. दरम्यान, भारताने सीरियातून 75 भारतीय नागरिकांना बाहेर काढले. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर या ऑपरेशनचे समन्वय दमास्कस आणि बेरूतमधील भारतीय दूतावासांनी केले.
सीरियातून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयामध्ये जम्मू-काश्मीरमधील 44 यात्रेकरूंचा समावेश आहे. जे सईदा झैनबमध्ये अडकले होते. सर्व भारतीय नागरिक सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत. त्यानंतर विमानातून त्यांना भारतात आणलं जाणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सरकार परदेशात भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. परराष्ट्र मंत्रालयाने सीरियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणार आहे.
सीरियात नेमकं काय झालं?
2011 मध्ये सुरू
झालेल्या सीरियातील गृहयुद्धाचा शेवट 8 डिसेंबर 2024 रोजी बंडखोर सैन्याने
बशर अल-असद यांना पायउतार केल्यानंतर झाला. बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर
ताबा मिळवल्यानंतर असद आपल्या कुटुंबासह सीरियातून पळून गेले. ज्या
विमानाने तो पळून गेले होते त्याचा रडारशी संपर्क तुटल्याचेही वृत्त आहे.
विमान अपघताता त्यांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता वर्तवली जात होती.
मात्र, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी
असद आणि त्यांच्या कुटुंबीयांना राजकीय आश्रय दिला आहे. रशियन
प्रेसिडेंशियल पॅलेसचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी माहिती दिली की
सीरियाच्या अध्यक्षांना आश्रय देणे हा पुतिन यांचा वैयक्तिक निर्णय होता.
No comments