श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे सकट यांचा विशेष सत्कार
अहिल्यानगर : शिवप्रताप दिनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे नालेगाव येथील गाडगीळ पटांगण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात भारतीय जनता पार्टी अनु.जा.मोर्चाचे शहरजिल्हा चिटणीस तथा महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुनिल भिमराव सकट यांनी रक्तदान करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले.
आतापर्यंत सुनील सकट यांनी अनेक वेळा रक्तदान करून समाजात जनजागृतीचे कार्य केले आहे.समाजसेवक सुनील सकट यांचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी डॉ.विलास मढीकर उपस्थित होते.
सत्काराला
उत्तर देताना सुनिल सकट म्हणाले, कि रक्तदान हे सर्वश्रेष्ट दान असुन ह्या
दानाने गरजु मनुष्याचा अनमोल जिव वाचवता येतो.म्हणुन प्रत्येक घरातुन
किमान एका व्यक्तीने रक्तदान करुन आपली नैतीक जबाबदारी बजावली पाहीजे.तसेच
सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने रक्तदान करावे.असे आवाहन त्यांनी केले
आहे.रक्तदान शिबीराचे रक्त संकलनाचे कार्य जनकल्याण रक्तकेंद्र यांनी केले
आहे.
No comments