आमदार किसन कथोरे यांना निवडून देण्यासाठी लिड देईल त्या नगरसेवकांना उमेदवारी अन्यथा तिकीट नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नामदेव शेलार / बदलापूर : हजारो कोटीचा निधी मिळवून
बदलापूर मुरबाडचा विकास करणाऱ्या आमदार किसन कथोरे यांना विजयी करा किसन
कथोरे यांचा विजय हा एकनाथ शिंदे चा विजय आहे असे उद्गार बदलापूर मध्ये
झालेल्या शेवटच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहे.
मुरबाड
विधानसभेचा कायापालट करणारा प्रतिष्ठित आमदार आपला उमेदवार आहे त्यांच्या
पाठीशी मी उभा आहे विधानसभा निवडणुका झाल्यावर लगेच महानगरपालिकेच्या
निवडणुका येतील त्यासाठी शिवसेना भाजपा राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी
लीड देऊन किसन कथोरे यांना निवडून आणावे अन्यथा त्यांना तिकीट (उमेदवारी)
दिली जाणार नाही असे सक्त आदेश सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवकांना
व्यासपीठावरून शिंदे यांनी दिले आहेत.
मी बोलतो तेच
करून दाखवतो तुतारी पिपाणी काही नाही मी ज्यांना खूप काही दिले जिल्हा
परिषद दिली निधी दिला ते सोडून गेले परंतु त्यांच्या सगळ्या ...पिळ्या
माझ्याकडे आहेत असे सांगून आमदार किसन कथोरे यांना निवडून आणण्याचे आवाहन
करून बदलापूरचे वामन म्हात्रे यांनाही सांगितले आहे आप आपसातील वाद होणार
नाहीत आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र यावे म्हात्रे कथोरे
दोघेही माझे आहेत.
किसन कथोरे विकासाचा पाईक आहे असेही एकनाथ शिंदे यांनी
सांगितले यावेळी व्यासपीठावर आमदार किसन कथोरे प्रमोद हिंदुराव आमदार
ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डाकी व इतर मान्यवर उपस्थित
होते हजारोच्या संख्येने मतदार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
मुख्यमंत्र्यांच्या सभेने आमदार किसन कथोरे यांच्या मताधिक्यामध्ये वाढ
झाली आहे.
No comments