आमदार किसन कथोरे यांना कुणबी सेनेचा जाहीर पाठिंबा समाज नेतृत्व धोक्यात घालणाऱ्या त्या नेत्या विरोधात कुणबी समाज नेते कार्यकर्ते मतदार आक्रमक..!
नामदेव शेलार / मुरबाड : कुणबी समाजाच्या नेत्यांना नेहमी
प्रत्येक निवडणुकीत टार्गेट केले जाते त्यांच्या पराभवासाठी समाजामधीलच
उमेदवार उभा करून किंवा समाजात फूट पाडून खच्चीकरण केले जाते त्यामध्ये बदल
घडवण्याचा समाज नेत्यांचा प्रयत्न यशस्वी होत असताना पुन्हा एकदा या
विधानसभा निवडणुकीत कुणबी समाजाचे आक्रमक नेते आमदार किसन कथोरे यांना
पराभूत करून समाजाचे खच्चीकरण करण्याचा मनसुबा छुप्या विरोधकांनी रचल्याचे
लक्षात येताच कुणबी सेना कुणबी समाज नेते कार्यकर्ते आक्रमक होऊन आमदार
किसन कथोरे यांना पाठिंबा दिला आहे.
कुणबी समाजाचे
युवा नेते रमेश शेलार यांनी ज्येष्ठ समाज नेते किसन कथोरे यांच्या प्रचारात
समाजाने उतरून त्यांना विजय करण्याचे आवाहन केले आहे तसेच महाराष्ट्र
कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी लेखी पत्र काढून जाहीर पाठिंबा
आमदार किसन कथोरे यांना दिला असून भिवंडी लोकसभेत अडीच लाख मते घेणाऱ्या
निलेश सांबरे यांनी सुद्धा किसन कथोरे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने
मतदारात उत्साह निर्माण झाला आहे.
कोणीही सोम्या
गोम्या उठतो आमदार किसन कथोरे यांच्यावर काहीही टीका टिपणी करतो त्यांना
सडेतोड उत्तर देण्यासाठी समाज संघटनेतील कार्यकर्ते आक्रमक झाले असून
भ्रष्टाचारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे सातबारे काढण्याचा इशारा
आमदार किसन कथोरे यांनी बदलापुरात एका प्रचार सभेत दिल्याने प्रचारात रंगत
चढली आहे.
एक मुरबाडचा दुसरा बदलापूरचा,ठेकेदार
यांच्या आरोप टिपणीने मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पण मी जेव्हा माझा
चष्मा खाली करेल तेव्हा बिनगुडाचे आरोप करणाऱ्यांचा सातबारा काढेल
प्रत्येकाची छुपी माहिती उघड करेल असे प्रत्युत्तर आमदार किसन कथोरे यांनी
नाव न घेता विरोधकावर प्रतिहल्ला केला दोन्हीही उमेदवार कुणबी समाजाचे
असताना मुंबई रत्नागिरी महाराष्ट्र तसेच कुणबी सेना जिजाऊ संघटनांनी आमदार
किसन कथोरे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने मुरबाड बदलापूर मध्ये वातावरण
तापले आहे.
No comments