निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकांना एक दिवसाची सुट्टी मिळावी , शिक्षण क्रांती संघटनेची निवडणूक आयोगाकडे मागणी
भिवंडी : सध्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे,काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे,यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मतदान प्रक्रियेच्या कामात यंञणेला हातभार लावत आहेत, माञ मतदान झाल्यानंतर दूस-या दिवशी आपल्या मूळ कर्तव्यावर परतावे लागते, त्यामूळे या कर्मचाऱ्यांना दूस-या दिवशी सूट्टी देण्यात यावी अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे राजाध्यक्ष सुधीर घागस यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सार्वञिकक निवडणूकांच मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे,या मतदान प्रक्रियेसाठी मतदानाच्या आदल्या दिवशी शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर हजर रहावे लागते, त्यानंतर मतदानासंबधी कार्यवाही करावी लागते ,दूस-या दिवशी मतदार मतदान करतात, मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना थांबावे लागते, यानंतर पूर्ण सोपस्कार पार पाडल्यानंतर मतपेट्या सूरक्षीत ठिकाणी ठेवाव्या लागतात, त्यासाठी राञीचे अकरा बाराही वाजतात, म्हणून मतदानाच्या दस-या दिवशी निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूट्टी देण्यात यावी अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे राजाध्यक्ष सुधीर घागस,मनोज महाजन,व किशोर राठोड यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन निवडणूक कर्तव्यावर असणा-या सर्वांना मतदानाच्या दूस-या दिवशी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सूट्टी देण्यात यावी, तसे ते पञ आपण जिल्हा मूख्य निवडणूक अधिकारी व त्या त्या विधानसभा निवडणुक अधिका-यांना निर्गमित करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे,
श्री सूधीर घागस ,राज्याध्यक्ष शिक्षक क्रांती संघटना
No comments