web-banner-lshep2024

Breaking News

गुंडाची पत्रकाराला भररस्त्यात मारहाण आरोपीला केली अटक..!

उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे एका गुंडाने पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. केवळ गुंडाची बातमी लावली म्हणून संतापलेल्या गुंडाने पत्रकाराला भररस्त्यात मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वीर नारायण शर्मा असं मारहाण झालेल्या पत्रकाराचं नाव आहे. तर भुरा पहलवान असं मारहाण करणाऱ्या गुंडाचं नाव आहे. गोवर्धन परिसरात ही घटना घडली आहे. पत्रकार शर्मा यांना या गुंडाविरोधात बातमी केली होती. याच रागातून आरोपीने शर्मा यांना मारहाण केली.

व्हिडीओत दिसत आहे की गुंड पत्रकाराला थापड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहे. यावेळी आरोपी शिवीगाळ करतानाही दिसत आहे. गुंडाने पत्रकाराला पाया पडून माफी देखील मागायला लावली. हा सगळा प्रकार घडत असताना रस्त्यावर बरीच गर्दी देखील जमली होती.

पत्रकाराने याबाबत पोलिसांना तक्रार केली आहे. पोलिसांना आधी गुन्हा दाखल करण्यासा टाळाटाळ केली. मात्र पत्रकारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर गुंडावर गु्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक केली आहे. 

No comments