मुरबाड कुणबी समाज हॉलमध्ये हजारो मुस्लिम मतदारांनी आमदार किसन कथोरे यांना दिला जाहीर पाठिंबा...!
नामदेव शेलार/ मुरबाड : विधानसभा निवडणुकीचा प्रचार
समारंभाची सांगता मुरबाड कुणबी समाज हॉलमध्ये हजारो मुस्लिम कार्यकर्ता
मतदारांनी आमदार किसन कथोरे यांना पाठिंबा देऊन निवडून आणण्याचे अभिवाचन
दिले त्यांच्या सभेने निवडणूक प्रचाराची समाप्ती झाली. मुस्लिम
समाजातील मुरबाड शहर तालुका बदलापूर अंबरनाथ कल्याण मधील मतदार कार्यकर्ते
यांनी आमदार किसन कथोरे यांनाच मतदान करण्याची शपथ घेऊन पाठिंबा दिला.
उपस्थित
मुस्लिम महिला पुरुष तरुणांना मार्गदर्शन करताना आमदार किसन कथोरे यांनी
सर्व मुस्लिम बांधवांची जबाबदारी घेऊन त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून
त्यांचं संरक्षण शिक्षण विविध कार्यक्रम मध्ये सामील होऊन गरीब लोकांना
घरकुले समाज हॉल शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ देण्याचे वचन दिले.
कार्यक्रमाचे आयोजन बदलापूरचे साकीब गोरे, निलेश शेलार ,साहिल सय्यद
(मौजू), नितीन तेलवणे ,नम्रता नितीन तेलवणे ,तौफिक सय्यद ,जावेद सय्यद,
मुक्तार शेख ,सय्यद शेख , अब्बास शेख, यासीन शेख व अन्य मान्यवर उपस्थित
होते वाढत्या मतदार विविध समाजाच्या प्रतिसादाने आमदार किसन कथोरे यांचा
विजय मोठ्या मताधिक्याने होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला
आहे.
No comments