आमदार किसन कथोरे यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिला प्रचाराच्या रिंगणात पेटून उठला सामान्य मतदार लीड कमी स्पीड कायम राहणार..!
नामदेव शेलार/ मुरबाड : विधानसभा निवडणुकीचा प्रचार कालावधी संपला असताना उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे जाहीर सभांना होणारी गर्दी पाहून काही जण भारावून गेले परंतु मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांचा कौटुंबिक नेतृत्वाचा बालेकिल्ला आहे बहुजन समाज नेत्यांचा माहेरघर आहे त्यांच्या घरात दादा ताई मोठ्या झाल्या तेथे आप्पा बाबांचा लीड कमी होईल मात्र विजयाचा स्पीड कायम राहील अशा भावना ज्येष्ठ नागरिक महिलांनी बदलापूर मुरबाड मध्ये प्रचार रॅलीत व्यक्त केले आहेत.
मुरबाड विधानसभा हा बहुसंख्या कुणबी समाजाचा भाग त्याचे नेतृत्व करणारे डॅशिंग नेते आमदार किसन कथोरे नेहमीच आक्रमक नेते राहिली आहे मात्र त्यांनी बहुजन समाजाला नेहमीच बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला राजकारण बाजूला ठेवून काम केले प्रत्येक सामान्य माणसाला भीतीमुक्त जगण्याचा हक्क अधिकार मिळवून दिला वाड्या-पाड्या गावासह शहराचा विकास करून ठाणे जिल्ह्याचा एकमेव समाज नेतृत्व म्हणून उभा राहिला त्यांच्या पराजयासाठी स्वपक्षासह अनेक विरोधक उभे राहिले आहेत नेता संपल्यावर मागचा कार्यकर्ता संपला याची जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण झाल्याने मुरबाड विधानसभा मतदारसंघांमधील प्रत्येक सामान्य माणूस मतदार पेटून उठला आहे पक्ष राजकारण बाजूला ठेवून आमदार किसन कथोरे यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराच्या रिंगणात उतरला असून नेहमी प्रमाणे लीड नाही मात्र त्यांच्या विजयाचा स्पीड कायम ठेवून आपल्या नेत्याचे मनोबल उंचावून आमदार किसन कथोरे यांच्या विजयासाठी सर्व हेवे दावे कार्यकर्ते ठेकेदारांवरची नाराजी दूर ठेवा असे अहवान प्रचारात केले जात आहे.
आपल्यालाच खांद्यावर बंदूक ठेवून शिकारीचा खर्च जंगलाच्या वाघ बाबा साठी दादा दादा साठी करत आहे स्वार्थ त्याचा आपल्या कुटुंबप्रमुखाला संपवण्यासाठी जंगलात लपून शिकार करत असेल तर आपणही सामान्य प्राणी म्हणून आपल्या प्रमुखाची सुरक्षा आणि विजय मिळवून देण्यासाठी जंगलाच्या रस्त्यातून बाहेर आलो पाहिजे अशा गोष्टींचा तंतोतंत समावेश मुरबाडच्या विधानसभेत होत असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे आपली नाराजी ठेकेदार दलालांवर असेल मात्र आमदार किसन कथोरे यांच्यावर नाही हे सार समजत असताना मतदार ठेकेदार वाटप चोर यांच्यावरील नाराजीचा फटका आमदार किसन कथोरे यांना येणार नाहीत महिलांना सुरक्षा सुरक्षितता त्यांच्या आरोग्य संदर्भात सुसूत्रता ज्येष्ठांच्यासाठी आपुलकी भावना तरुणांना संस्कार प्रेरणा देणारे आमदार किसन कथोरे यांना यावेळी सामान्य मतदार संधी देणार आहे ठेकेदार रेशनदार बिल्डर्स यांचा लावा जावा लीड कमी करतील मात्र नक्षत्राचं देणं असलेल्या विकास सम्राटाचे विजयाची स्पीड तोडणार नाहीत अशा भावना मुरबाड विधानसभा विकास मंचच्या अध्यक्ष ज्योति शेलार यांनी व्यक्त केले आहेत.
पाच वर्षे आमदार किसन कथोरे यांची पुढील 25 वर्ष दादाभाऊ ची त्यासाठी संयम हवा पुढे पुढे करणारे स्वतःचा स्वार्थ साधतात मात्र सामान्य कार्यकर्ता मतदार जेष्ठ नेत्यांना स्वाभिमान म्हणून मदत करतात आपल्या नेत्यासाठी वरिष्ठ पातळीवरील पक्षाचे नेते धावून येत नाहीत त्याचा आपल्या सामान्य माणसाला काय न्याय देणार आपल्याला न्याय देणारा आपल्या सुखदुःखात धावणारा आपलाच आमदार किसन कथोरे आहेत त्यांना एक संधी सर्वांनी द्यावी काही चुका असतील त्या विजयानंतर त्यांच्या कानावर घालू अशा प्रचाराच्या पडद्यामागून कार्यकर्ते मंडळी काम करत आहेत. मुरबाड कल्याण बदलापूर अंबरनाथ मध्ये स्थानिक कार्यकर्ता पत्रकार यांना उमेदवार नेत्यांनी सामावून घेतले पाहिजे आपुलकीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्थानिक परिपूर्ण माहिती असणाऱ्या पत्रकारांच्या भावनांची कदर केली पाहिजे मात्र तसं होत नाही उपरे उरावर किती दिवस बसवणार अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
एक मात्र खरं वाटप मापक हे पैसे कमावणारे असतात त्यांच्याशी उमेदवाराचा रोजचा संपर्क येत नाही पण चुकीचा जाब विचारल्यास नाराजीचा सूर दूर होण्यास वेळ लागत नाही स्वतःच्या घरातील भाकरी खाऊन घरदार व्यवसाय उघड्यावर टाकून उसनवारीचा डिझेल पेट्रोल किती दिवस धुर काढणार याचा फटका लीडचा स्पीड कमी करण्यास कारणीभूत होऊ शकतो या घटना दोघांकडे घडत असल्या तरी प्रामाणिकता निस्वार्थी स्वाभिमानी प्रत्येक यंत्रणा माणूस मतदार कार्यकर्ता आमदार किसन कथोरे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहत असल्याने गेल्या वीस दिवसाच्या प्रचारात लीड कमी मात्र स्पीड कायम विजयाचा असा आशीर्वाद आमदार किसन कथोरे यांना असल्याचे महिलांनी प्रचार रॅलीत भावना व्यक्त केल्या आहेत.
No comments