मुरबाड विधानसभा निवडणुकीसाठी 518 पुलिंग बुथवर 8000 च्या वर कर्मचारी अधिकारी तैनात निवडणूक अधिकारी अंजली कानडे (पवार) सहाय्यक निवडणूक अधिकारी अभिजीत देशमुख यांनी निवडणूक सुसज्ज पार पाडली..!
नामदेव शेलार/ मुरबाड : मुरबाड विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कानडे (पवार) सहाय्यक निवडणूक अधिकारी अभिजीत देशमुख यांनी 518 पुलिंग बुथवर करडी नजर ठेवून निवडणूक यशस्वी पार पाडली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत सतर्क राहून निपक्षपाती निवडणुकीचे काम निवडणूक अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी सुसज्ज पार पाडली आहे कोणताही अनुसूचित तसेच गैरप्रकार घडला नाही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागता पहारा देऊन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी काम केले आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात चार लाख 70 हजाराच्या वर मतदार संख्या असून त्यामध्ये बदलापूर अंबरनाथ ग्रामीण मुरबाड तालुका कल्याण ग्रामीण यांचा समावेश येतो 518 पुलिंग बुथ असून प्रत्येक पुलिंग बूथ वर पाच ते आठ अधिकारी कर्मचारी काम पहात असून त्यांची संख्या साडेचार हजाराच्या वर असून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीन हजाराच्या वर काम पहात आहे.
मतदान पेट्या वेळेवर बूथ वर पाठवण्यात आल्या,मुरबाड बाजारपेठेत ट्राफिक जाम होऊ नये म्हणून मुरबाड नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी मनोज म्हसे यांनी अर्धे बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवून नागरिक तसेच निवडणूक साहित्य नेण्यास उपाययोजना केले आहेत.
निवडणुकीच्या एक खिडकीमध्ये उमेदवारांना प्रचार परवानगी तक्रारीची दखल घेण्यासाठी उपाययोजना राबवून सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. मत पेट्या ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कक्षात तीन जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे होणार असून शहरातील चौफेर रस्ते पोलीस बंदोबस्तात बॅरिकेट उभे करण्यात आले आहेत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कानडे (पवार) सहाय्यक निवडणूक अधिकारी अभिजीत देशमुख यांनी केले,
टपाली मतदानासाठी मुरबाड तहसील कार्यालयात वेगवेगळ्या मतदान केंद्र उभारण्यात आले होते मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकूण नऊ उमेदवारांचा भविष्य पेटीत बंद झाले असून अत्यंत शांततेने मुरबाड विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे मतदारांनीमोठया प्रमाणात मतदान करावं असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले होते
No comments