web-banner-lshep2024

Breaking News

निवडणुका कालखंडात मुरबाड मध्ये माती रॉयल्टी चोरी जुगार क्लब मटका धंद्यांना तेजी तहसीलदारांनी घटनास्थळाची पाहणी करून कारवाई करावी..!

मुरबाड (प्रतिनिधी) : गेल्या महिनाभरात निवडणुकीच्या आचारसंहिता धावपळीचा फायदा मुरबाड तालुक्यातील माती उत्खनन रॉयल्टी चोरी जुगार क्लब मटका दारूवाल्यांनी घेऊन लाखो रुपये कमाई केली आहे निवडणुकीच्या धामधुमीत महसूल अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांचे माती उत्खनन करून रॉयल्टी चोरी करणाऱ्या कडे दुर्लक्ष झाले. 

मुरबाड नगरपंचायत हद्दीत शहरालगत माती उत्खनन रात्री करून त्याची वाहतूक करणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी काही नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे घटनास्थळी पाहणी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे तक्रारदारावर दहशत गुंडगिरी करून रॉयल्टी चोरी केली जाते स्थानिक तलाठी सर्कल यांना हाताशी धरून रॉयल्टी चोरी सरासपणे सुरू आहे मुरबाड नगरपंचायत हद्द एमआयडीसी तसेच तालुक्यात माती उत्खनन वाहतूक दगड खाणी रेती वाहतूक जोमाने सुरू आहे. 

मुरबाड शहरात तीन चार ठिकाणी जुगाराचे क्लब अड्डे मटका धंदे जोमाने सुरू आहेत लाखो रुपये हप्ते देऊन अवैध धंदे सुरू असल्याने मुरबाड शहरात चोऱ्यांचा प्रमाण वाढला आहे गुंडगिरी वाढली आहे कायदा सुव्यवस्था डळमळीत झाली आहे. शहरातील अनेक दुकाने घरे फोडून चोऱ्या झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. 

मुरबाड तालुक्यात प्रशासन कमकुवत झाल्यावर अवैध धंदे तेजीत चालतात त्यामुळे गुन्हेगारी चोऱ्यामाऱ्या वाढतात याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे निवडणुका संपले आहेत अधिकाऱ्यांना कारणे सांगण्यास जागा नाही परंतु प्रामाणिक जनतेची सेवा सुरक्षा केल्यास अवैध धंदे बंद होतील अशी शहरवासीयांनी प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केली आहे शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील कारवाई केली जात नाही अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घातले जाते त्याचा फटका तालुक्यातील सामान्यांना बसत आहे.

No comments