web-banner-lshep2024

Breaking News

लोकांच्या भावना तीव्र किसनराव कथोरेच हवे नेतृत्व..!

नामदेव शेलार / मुरबाड,ठाणे :  जगण्यासाठी काय लागतोय मिट,मसाला,भाकर आणि चटणी राहण्यासाठी झोपडी असावी किंवा बंगला त्यामधील संस्कृती असावी ज्ञानी आयुष्याची शर्यत संपली धावता पलटा प्रत्येकाच्या अंगणी हीच जीवनाची कहाणी जन्मापासून तारुण्यपर्यंत काही ठरवलं नव्हतं मात्र सज्ञात झाल्यावर स्वातंत्र्यापूर्वी काळखंडाच्या आठवणी डोळ्यासमोर ठेवून सामाजिक चळवळ डोळ्यासमोर ठेवून समाजसेवेतून आपल्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरवलं त्याच प्रवासापासून जीवनाची शर्यत सुरू झाली आजही शेवटच्या श्वासापर्यंत शर्यत संपलीच नाही मात्र अखेरची मुलाखत बाकी आहे... त्याचा हिशोब येथेच देऊन टाकण्याचा प्रयत्न आमदार किसनराव कथोरे यांनी केला आहे..!
माणसाच्या जीवनात प्रत्येकाला हिशोब तर द्यावाच लागतो तुम्ही कोणत्या क्षेत्रात असू द्या त्यांच्या व्यवसायाचा हिशोब दररोज लिहून वर्षातून कर रुपी द्यावा लागतो त्यातूनच ज्यांनी माणूस म्हणून कर्तव्य करण्यास धरतीवर पाठवलं त्याला स्वकर्माचा हिशोब स्वतंत्र द्यावा लागतो त्याचं स्मरण करून आमदार किसनराव कथोरे यांनी आपल्या सामाजिक चळवळी मधून राजकारणाची कास धरली त्यामधून अखंड सामाजिक व्रत जोपासले अन्न पाणी निवारा गरजा पूर्ण करताना शिक्षण भविष्याची नांदी ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळेतून पहिले इंग्रजी शिक्षण काढून त्याची प्राप्ती कॉलेज पर्यंत वाढवली त्यापलीकडे जाऊन उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडले त्याचा फायदा ग्रामीण भागाला झाला. 
 
 सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद पासून आमदारकी पर्यंत पदे भूसविली त्यामधून समाज एकता जोपासून बहुजन समाजाची गाठ बांधली हा आमदार किसनराव कथोरे यांचा राजकीय पाया पद खुर्ची सत्ता केवळ पैसा आणि राजकारणासाठी असतो त्याचे आत्मपरीक्षण करून त्यांनी संस्कार संस्कृती परंपरा भक्ती भाव देवदर्शनाला स्मरून ज्ञान आणि समतोल याचे पावित्र्य जपले माझ्या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग काबाडकष्ट करून शेती पिकवतो त्यांना शासनाच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ दिला ठाणे जिल्हा पालघर कोकणाचा एक प्राबल्य डॅशिंग समाज नेता म्हणून आमदार किसनराव कथोरे यांची राज्य आणि देशात ओळख आहे त्यांचे अनेक शब्दांचा प्रभाव समाजावर पडलेला आहे माझ्या माणसांच्या डोळ्याची पापणी उपटली तरी माझ्या डोळ्यात पाणी येते यामधून सामाजिक एकता अधिक घट्ट झाली मात्र त्यांच्यासोबत असलेल्या सर्व जाती धर्माच्या बहुजनित लोकात आमदार किसनराव कथोरे तितकेच आत्मविश्वास निर्माण करून आहेत माझी माती माझी माणसं आणि एक विश्वासातला बाप समाजाचा डॅशिंग नेता विकासाचा वादळ हा आदर त्यांचा आजही अखंड आहे. 
 
त्यांना चीटर फिटर लफंगे फसव्या चित्रविचित्र काम कमी शायनिंग जास्त गर्विष्ठ मोठेपणा गुंड मवाली अशा माणसांची फार चिड आहे आमदार किसनराव कथोरे एक ठाणे कोकणाचं चालतं फिरत आधारस्तंभ आहे आजही त्यांच्या आधाराने लाखो लोक जीवनात सुखी समाधानी आहे सुरक्षित जगतात म्हणून त्यांना "एक विश्वासातला बाप" असा शब्द प्रयोग केला आहे. निवडणुका येतात जातात परंतु आपल्याला डॅशिंग नेतृत्व हवं हेच प्रत्येकाचं मागणं असतं म्हणून गेली 50 वर्षाच्या कालावधीनंतर ही आमदार किसनराव कथोरे यांचे नेतृत्व बहुजन समाजाने मान्य केला आहे अहोरात्र धावपळ करून त्यांना राजकारणाची शर्यत जिंकायाची नाही तर प्रत्येक कुटुंबाची सुरक्षितेता आणि जबाबदारी पार पाडायची आहे एक कुटुंबाचा प्रमुख लाखो कुटुंबाची दरडोही जबाबदारी सांभाळत आहे त्यामध्ये त्यांचा स्वार्थ नाही असा वटवृक्ष आमदार किसनराव कथोरे यांची शर्यत अद्याप संपलेली नाही....तेही तुमच्यासाठी...!

स्वर्गीय शांतारामभाऊ घोलपानंतर आक्रमक नेता आमदार कथोरे 

कुणबी समाजात ठाणे कोकणामध्ये स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप साहेबांनंतर आमदार किसनराव कथोरे हे एकमेव आक्रमक नेते आहेत त्यांना चॅलेंज जमत नाही त्यांना आपुलकी साजिश आहे विविध जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांचं योगदान स्वसमाजा एवढेच आहे. माणूस म्हणून जगण्याचा भक्तीमय आनंद लुटण्याचा छंद म्हणून समाजकारण आणि राजकारण आपल्या जिल्हा कोकणासह मुरबाड विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकास कामासाठी करणे भाग पडलय कारण आयुष्याची शर्यत तेथेच सुरू आहे. प्रत्येक माणसाला परतीच्या प्रवासाला जावं लागतं परंतु जाता जाता आपलं नाव कोरून ठेवावे अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याचे प्रारब्ध वेगवेगळ्या क्षेत्रातून निर्माण होते असाच कर्मयोगी इतिहासात नाव कोरण्याचे काम आमदार किसनराव कथोरे यांनी केले आहे ज्ञानसाधना भक्ती भाव साम दाम दंड भेद जसाच तसे आक्रमक भूमिका मात्र संयमाचा संदेश अशी त्यांची कहाणी आहे. 
 
 प्रशासनावर घट्टपक्कड आणि प्रशासकीय सामाजिक राजकीय मैत्री जोपासून एक धागा सुखाचा लाखो जनमाणसांसाठी हेच सूत्र त्यांच्या कार्यातून कोणाला दृष्टी दिली कोणाला जीवनदान कोणाला मदतीचा हात तर कोणाला मायेचा पाझर अनेकांना बापाची सावली दिली लाखोंना आधाराचं समुद्र म्हणून येथेच सारा कर्माचा हिशोब दिला असा दाता देवता लोकक्रांती राजा म्हणून तुमचीच छाया अखंड राहो अशी शुभेच्छा वर्षाव लाखो लोकांनी केला आहे. 
प्रत्येक माणसाच्या कार्यप्रणालीची मुलाखत देव घेतो त्यावेळी पहिला प्रश्न विचारतो तुम्ही धरतीवर काय केले? याच प्रश्नावलीत संपूर्ण जीवन गाथा असते दान धर्म भक्ती गर्व प्रारब्ध कर्म पाप पुण्य अशा सर्वच हिशोब केला जातो हाच हिशोब आपण ज्या ज्या मानवतामध्ये जाणून घेतो तसाच प्रत्यय आमदार किसनराव कथोरे यांच्या समाज नेतृत्वातून प्रत्येकाला आला आहे. 

लोकांच्या भावना तीव्र किसनराव कथोरेच हवे नेतृत्व..!

वीज पाणी रस्ता आरोग्य रोजगार सुरक्षितता सामाजिक राजकीय वारसा अशा सर्व समस्या संकटात पाठीशी उभा राहणारा समाज आणि बहुजन समाजाचा स्थानिक नेता म्हणून आमदार किसनराव कथोरे हेच नेतृत्व हवे आहे. आमदारकीचे डोहाळे अनेकांना लागले जातात पण असा नेता पुन्हा होणे नाही आपल्याला राजकारण नको माणसातला माणूस हवा आहे आपला माणूस दुसऱ्याची टोपली डोक्यावर घेऊन भटकंती करण्यापेक्षा कौटुंबिक एकता निर्माण करण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करूया अशा भावना लोकातून तीव्र होत आहेत. 

आमदार किसनराव कथोरे नक्षत्राचं देणं..!

हे वटवृक्ष आहे कोणीही यावे आणि टपली मारून जावं एवढे सोपे नाही चॅलेंज स्वीकारण्याची बाळकडू पासून सवयी म्हणून स्पर्धकच राहिला नाही म्हणून शर्यत संपली पण जीवनातील समाजासाठी संघर्ष विकास ध्येय जोपासण्याची शर्यत अद्याप बाकी आहे. दगडाला शेंदूर थापून देव घडविणे त्यांना पसंत नाही बुद्धिमत्ता संस्कार संस्कृती संघर्षीतून दगडावर घाव घालून त्यांच्या मूर्तीला आकार देणार वटवृक्ष म्हणजे आमदार किसनराव कथोरे....
 
 स्वातंत्र्यापासून अनेक नेते येथे घडले त्यामधील ठराविक किर्तीरुपी उरले मात्र मुरबाड कुणबी समाजात कै. शांताराम भाऊ घोलप (2) माजी आमदार गोटीरामभाऊ पवार (3) आमदार किसनराव कथोरे हे तीनच नेते समाजाचे नेते ठरले त्यातील सर्वात आक्रमक डॅशिंग नेतृत्व आमदार किसनराव कथोरे ठरले आहेत त्यांच्या सामाजिक चळवळीतून विविध समाजाचे नेते आमदार किसनराव कथोरे यांनी घडवले राज्यात ज्यांच्या शब्दाला मान सन्मान आणि कोटी लोकात ज्यांची कर्तुत्व आहे त्यांना येत्या विधानसभेत पुन्हा एक मताने  प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे अशी भावना गावोगावी व्यक्त होत आहेत.

No comments