दसऱ्याच्या मुहूर्तावर मुरबाड मध्ये राजकीय हालचाली वाढल्या cm eknath shinde यांना जबरदस्त धक्का अख्खी शिंदे सेना शरद पवार पक्षात...!
नामदेव शेलार/ मुरबाड : पावसाळ्यापूर्वी काजवे चिंम-चिंम
करतात मुसळधार पाऊस पडल्यावर काजवं गायब होतात त्यामधून सारे लोक अंगणात
आनंद घेतात तसाच कालावधी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसू लागला आहे
विधानसभेत भाजपाच्या खासदारांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे खंदे समर्थक शिवसैनिक सुरेश (बाल्यामामा) म्हात्रे यांनी
राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तेथे खासदार
झाले मात्र गेले किंवा त्यांना पाठवले या चर्चेला पूर्णविराम मिळाला नाही
तोच मुरबाड विधान सभा भाजपाकडून हस्तक्षेप करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या
शिवसेनेतून जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष पवार शरद पवार राष्ट्रवादी पक्षात
सर्व पदाधिकाऱ्यांसह प्रवेश करून भाजपाचे अस्तित्व ठाणे जिल्ह्यातून
घालवण्याचा डाव असल्याची चर्चा आहे.
मुरबाड
तालुक्यात एकनाथ शिंदे यांची संपूर्ण शिवसेना माजी आमदार गोटीराम पवार
राष्ट्रवादी यांची होती त्यांचा स्वगृही प्रवेश पुन्हा शरद पवार यांच्या
पक्षात झाल्याने शिंदे सेना संपूर्ण खाली झाली आहे शिंदे यांची शिवसेना
म्हणजे गोटीराम पवार यांची राष्ट्रवादी होती. मूळ शिवसेनेचे कार्यकर्ते
पदाधिकारी जेष्ठ शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने त निष्ठावंत राहिले
आहेत त्यांच्या मदतीने शरद पवार यांचा खासदार निवडून आला त्याचं शिवसेनेचा
मताधिक्य मागील 2019 च्या विधानसभेला आमदार किसन कथोरे यांना 1,60,000 चे
मतधित्य मिळाले होते.
सुभाष पवार हे ठाणे जिल्हा
परिषदेचे उपाध्यक्ष होते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक आहेत
तसेच गोटीराम पवार यांचे समर्थकांच्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती
,मुरबाड तालुका खरेदी विक्री संघ, सहकार सोसायटी आजही जेथे पवार फॅक्टर तेथे
त्यांचे समर्थक जातात सुभाष पवार यांच्या शरद पवार राष्ट्रवादी प्रवेशाने
पुन्हा मुरबाड मध्ये राष्ट्रवादी उभारी होईल मात्र त्यांचा साथीदार मित्र
पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी भाजपा शिवसेनेत जाऊन त्यांना शह देण्याचा
प्रयत्न करताना येत्या निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे.
यापूर्वी सत्ताधारी
आणि विरोधी असे दोनच पक्ष मुरबाड विधानसभेत होते या कालावधीत भाजपा दोन गट
शिवसेना दोन गट राष्ट्रवादी दोन गट काँग्रेस एकच गट आहे मात्र काँग्रेसची
ताकद कमजोर आहे यापूर्वीही मित्र पक्षांना अंतर्गत संपवण्याचा डाव
राजकारणात खेळला गेला आहे तेथे ताकदवान नेत्यांच्या पाठीमागे लोक जातात
समाजाचा फॅक्टर चालतो परंतु एकाच समाजाचे नेते प्रत्येक पक्षाचे प्रमुख
असल्याने समाजाच्या लोकांची छाळणी फाळणी होत आहे विधानसभेला एकाच समाजाच्या
नेत्यांमध्ये कडवी लढत होणार असल्याने "जीता वही सिकंदर" असे बोलले जाते.
No comments