web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड विधानसभा मतदार संघात दोन पवार एकत्र; सुभाष पवार करणार मतदार समीकरणावर मात..!

नामदेव शेलार / मुरबाड : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार किसन कथोरे यांना बहुमताने निवडून दिलेले शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सह संपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राम राम ठोकून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी प्रवेशाची माहिती पत्रकार परिषदेत देताना आपण निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आलो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप काही दिले परंतु उमेदवारी दिली नाही असे सांगून मुरबाडच्या स्थानिक उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
 माझ्या वडिलांच्या शिकवणीने स्वच्छ राजकारण करत आहे बदलापूर अंबरनाथ कल्याण ग्रामीण मुरबाड मध्ये मतदानाचे समीकरण आपण बदलणार आहोत स्थानिक युवक महिला जेष्ठ नागरिक मतदारांना बदल हवा आहे त्यासाठी सर्वच पक्षाची मदत होईल असे सांगून या मतदारसंघात अदृश्य शक्तीचा माझ्या मदतीला धावणार असल्याचा सुचक खुल्लासा सुभाष पवार यांनी केला. 
 
 मुरबाड विधानसभा मतदार संघात गेली दोन शतके मुरबाड मतदार संघात गोटीराम पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सत्ता होती गेल्या पंधरा वर्षात झालेला उमेदवारी बदल आणि दोघांमध्ये निर्माण झालेली दरी या निवडणुकीत दूर झाली आहे सुभाष पवार यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी स्वतः गोटीराम पवार माजी आमदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून थेट मुरबाडची उमेदवारी घेऊन आले दोन्हीही पवारांची असणारी राजकीय ताकद भाजपाला शह देत आहे त्यांना काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना मदतीचा हात देताना माजी केंद्रीय मंत्री भाजपा कपिल पाटील यांचे गटाचे पदाधिकारी सुभाष पवार यांना अदृश्य शक्तीचा हात देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सुभाष पवार यांच्यासोबत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा मधील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उभे असल्याने सुभाष पवार मतदारांचे समीकरण बदलणार असल्याचे सांगत आहेत.

No comments