भाजपा उमेदवारांच्या 52कुळेच्या यादीत आमदार किसन कथोरे यांचा 52 वा क्रमांक विरोधकांची निराशा
नामदेव शेलार / मुरबाड : ज्यांनी आमदार किसन कथोरे यांना
उमेदवारी भाजपा मधून मिळू नये यासाठी पाण्यात देव बुडवून ठेवले होते
त्यांच्या बुडाला आग लावून भाजपा अध्यक्ष 52कुळे यांच्या उमेदवारी यादी त
आमदार किसन कथोरे यांचा 52वा क्रमांक पहिल्या यादीत आला आहे.आमदार
किसन कथोरे यांची उमेदवारी जाहीर होताच मुरबाड विधानसभा मतदारसंघात जल्लोष
उसळला आहे गेली अडीच वर्ष सुखा-तुकानी कपा- कपा छान मारून किसन कथोरे
यांना आमदारकीची उमेदवारी मिळवू नये यासाठी प्रयत्न केले परंतु विकासाच्या
वादळाने त्यांचे पत्रे छपरे उडवून लावल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी
व्यक्त केल्या जात आहेत.
मुरबाड विधानसभा मतदार
संघापेक्षा आमदार किसन कथोरे कोकण ठाणे जिल्ह्याचा मातम्बर कुणबी समाजाचा
नेता आहे त्यांच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांशी असलेला सल्लोखा
जनसंपर्काने येथे भाजपा पक्ष वाढला आहे भाजपा मधील अंतर्गत गटबाजीची दखल
पक्ष षेष्ठीने घेऊन पहिल्या उमेदवारी यादी 52 क्रमांकावर नाव प्रसिद्ध
झाल्याने गटबाजी छुप्या पद्धतीने कथोरे यांना विरोध करणाऱ्यांना पक्षाच्या
नेत्यांनी चपराक दिली आहे.
मला पक्ष टिकीट देणार
असताना मला अपक्ष लढण्याची गरज काय असे उत्तर आमदार किसन कथोरे यांनी
गेल्या आठवड्यात त्यांच्या विरोधकांना दिला होता ज्यांनी ज्यांनी आमदार
किसन कथोरे यांना विरोध केला भाजपामधून त्यांच्या हकलपट्टीची मागणी केली
गटबाजीतून अदृश्य शक्तीचा प्रयोग केला त्यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष
बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत चपराक देऊन बुडाला आग लावली
आहे असा जल्लोष कार्यकर्त्यांनी केला आहे.
तीन वेळा
भाजपाचे आमदार असलेल्या किसन कथोरे यांना पहिल्या यादीत स्थान देऊन
त्यांच्या पक्ष वाढीच्या लोक मताला अधिक महत्त्व वाढवलं आहे उमेदवारी जाहीर
झाल्याने कथोरे यांच्या प्रचाराला कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे
मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुरबाडच्या
जागेची मागणी करण्यात आली होती परंतु त्याकडे डोळे लावून बसलेल्याना तुतारी
फुकावी लागणार असून भाजपा उमेदवार किसन कथोरे यांच्या विरोधात काम
करणाऱ्यांना पक्ष आणि पदाला मुकावे लागणार असल्याची चर्चा आहे.
No comments