139 मुरबाड विधानसभा मतदार संघातील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय व स्ट्रँग रूमला ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिलीभेट
गौरव शेलार / मुरबाड : 139 मुरबाड विधानसभा मतदार संघातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड येथील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय व स्ट्रँग रूमला आज ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी भेट दिली.
यावेळी स्टॅ्रांग रूम आणि मतमोजणी कक्षाबाबतच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी 139 मुरबाड विधानसभा मतदार संघाचे तहसिलदार तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अभिजीत देशमुख ,निवडणुक निर्णय अधिकारी अंजली कानडे पवार ,मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोज कामत यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
No comments